ग्रंथालयाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी दि.25 सप्टेंबरला कार्यशाळा
*जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते उद्घाटन
*राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता
          अमरावती, दि.23 (जिमाका): राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता अंतर्गत अनुदान योजनेतुन ग्रंथालयासाठी राबविण्यात येणाऱ्या व असमान अर्थसाह्याच्या विविध योजनांच्या व ग्रंथालय संचालनालयाकडुन राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने रविवार, दि.25 सप्टेंबर 16 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. राजकमल चौक येथील मनपा टाऊन हॉल येथे होणाऱ्या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते सकाळी 11 वा. करण्यात येईल.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अमरावतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, विशेष अतिथी म्हणुन मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, अप्पर कोषागार अधिकारी कि. ग. चौधरी, राजा राममोहन रॉय ग्रंथालय कोलकाताचे पश्चिम विभागाचे सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी दिपांजन चटर्जी, जिल्हा ग्रंथालय संघ अमरावतीचे सह कार्यवाहक प्रदीप चौधरी, शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. महेंद्र मेटे, शासकीय विभागीय ग्रंथालय अमरावतीचे राजेंश पाटील, जिल्हा ग्रंथालय संघ अमरावतीचे कार्यवाहक राम देशपांडे सहाय्यक ग्रंथालय संचालक मिनाक्षी कांबळे प्रामुख्याने उपस्थित राहतील.
          सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यत चालणाऱ्या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रादरम्यान ग्रंथालयाच्या कार्यपुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांसह ग्रंथप्रेमीनी एक दिवसीय कार्यशाळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ. वा. सुर्यवंशी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती