Tuesday, October 4, 2016

पालकमंत्री प्रविण पोटे यांची छायाचित्र प्रदर्शनीस भेट
सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा आवश्यक 

          अमरावती, दि.25 (जिमाका): येथील  अंबानगरी फोटा-व्हिडीओग्राफर्स असोशिएशन, अमरावती प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या श्रीसंत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मधील आर्ट गॅलरी येथे दिनांक 26 सप्टेंबर 2016 पर्यंत आयोजित राज्यस्तरीय भव्य छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीस पालकमंत्री प्रविण पोटे यांनी भेट देऊन छायाचित्रांची पाहणी केली.

          यावेळी सर्वश्री राजेश वाडेकर, राहुल आंबेकर, रुपेश फासाटे, निलेश चौधरी, मनिष जगताप आदि सदस्य उपस्थित होते.

          या प्रदर्शनात राज्यभरातील निसर्गवेड्या छायाचित्रकारांनी अप्रतिम छायाचित्र काढून यात सहभागी झाले होते. या छायाचित्र प्रदर्शनीतून राज्यातील तसेच मेळघाटातील पक्षी व निसर्गसंपदा पहावयास मिळते. पक्षीवैभव हे समृद्ध वनसंपदेचे लक्षण असून अमरावती जिल्ह्यातील विविध प्रकारच्या दुर्मिळ पक्ष्यांची छायाचित्रे छायाचित्रकारांनी टिपले असून ती सर्वांना उद्यापर्यंत पहावयास मिळणार आहे. या प्रदर्शनास आतापर्यंत 30 हजार लोकांनी भेटी देऊन आनंद घेतल्याची माहिती रुपेश फासाटे यांनी यावेळी दिली.

          ना. पोटे यांनी सर्व छायाचित्रांचे कौतुक करुन सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा नियमित घ्याव्यात अशी सूचना करुन मेळघाटातील निसर्गसंपदा जगापुढे आणण्यासाठी आर्ट गॅलरीसाठी आपण जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले.

00000





No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...