अमरावती जिल्ह्यातील रेती स्थळांचे ई-निविदा-ई-लिलाव
(पहिला टप्पा-पहिली फेरी)

            अमरावती, दि.21 (जिमाका): सन 2016-17 (30 सप्टेंबर 2017 अखेर पर्यत) वर्षाकरीता अमरावती जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील 10 तालुक्यामधील 54 रेती स्थळांचे लिलाव प्रक्रिया ई-निविदा-ई-लिलाव (पहिला टप्पा-पहिली फेरी) ऑनलाईन प्रणाली द्वारे दि.20 सप्टेंबर 2016 पासुन सुरु होत आहे. ई-निविदा बाबतचा संपूर्ण तपशील हा https://eauctioncollamr.abcprocure.com तसेच ई-लिलाव बाबतचा संपूर्ण तपशील https://www.eauctioncollamr.abcprocure.com या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. रेतीघाटा संबंधीची विस्तृत माहिती उपरोक्त वेबसाईटवर तसेच सर्व संबंधित कार्यालयात तसेच amravati.nic.in वेबसाईट वर उपलब्ध राहील. ई-निविदा-ई-लिलाव मध्ये भाग घेण्यापूर्वी सदर प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांन नव्याने नोंदणी करणे तसेच डिजीटल सर्टीफिकेट काढणे आवश्यक आहे. ई-निविदाधारक तसेच लिलावधारकाकडे पॅन कार्ड, व्हॅट रजिस्ट्रेशन (टीन कार्ड) असणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना रेती ई-निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. रेती लिलावच्या ई-निविदा-ई-लिलाव प्रक्रियेत सर्व संबंधितांना भाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले आहे.
00000

काचावार/कोल्हे/21-09-2016/16-31 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती