Tuesday, October 4, 2016

जिंकलेल्यांचे अभिनंदन व पराजितांनी जास्त परिश्रम घेवून यश मिळवा
पोलिस अधिक्षक लखमी गौतम
* राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न
          अमरावती, दि.27 (जिमाका): स्पर्धेमध्ये जय आणि पराजय हे सुरुच असते. विजयी संघांचे अभिनंदन तसचे स्पर्धेत अयशस्वी ठरलेल्या संघांनी खचुन न जात येणाऱ्या स्पर्धांमध्ये अधिक परिश्रम घेवून यश संपादन करावे असे प्रतिपादन पोलिस अधिक्षक लखमी गौतम यांनी केले.

          येथील विभागीय क्रीडा संकुल येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारोह प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा क्रीडा व युवक संचालनालयाच्या उपसंचालक प्रतिभा देशमुख, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष जयंत देशमुख, पंजबाराव देशमुख बँकचे अध्यक्ष संजय वानखडे, युबीए बास्केटबॉलचे संचालक विवेक मेहता, बास्केटबॉल संघटनेचे सहसचिव ललित नहाट, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, निवड समितीच्या विजया खोत आदी उपस्थित होते.

          लखमी गौतम म्हणाले की, खेळ हा जीवणातील सर्वात मोठा शिक्षक आहे. हा शिक्षक यश आणि अपयश पचविण्याचे शक्ती निर्माण करतो त्यामुळे जे यशस्वी झाले त्यांनी अयशस्वी संघाला कमी लेखू नये. अयशस्वी संघांनी अधिक परिश्रम करुन यश कसे संपादन करता येईल या कडे लक्ष देण्याची गरज आहे.

       प्रतिभा देशमुख म्हणाल्या की, खेळामध्ये शक्ती सोबत युक्ती वापरणे सुद्धा महत्वाचे असते. प्रत्येक खेळाडू समय सुचकतेने खेळात चपळता दाखवितो त्यानुसार संघ हा यशस्वी होणार की अयशस्वी होणार हे ठरते. या स्पर्धेत सहभागी झालेले प्रत्येक खेळाडूमध्ये ही समयसुचकता असल्याने तो उत्कृष्ट खेळाडू आहे.

उत्कृष्ट खेळाडू
       राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत 14 वर्षाखालील वयोगटात उत्कृष्ट खेळाडू म्हणून कोल्हापूरच्या यश पवार तसेच मुलींमध्ये पुण्याची सानिका ची निवड करण्यात आली. 17 वर्षाखालील वयोगटात मुलांमध्ये पुण्याचा कोकाटे, मुलींमध्ये मुंबई ची राणी, 19 वर्षाखालील वयोगटामध्ये मुंबईचा जस्टीन तर मुलींमध्ये मुंबईच्या साक्षीला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.


विजयी संघ
       या स्पर्धेत राज्यातील विविध संघांनी सहभाग घेतला होता. या तीन दिवसीय स्पर्धेत विविध गटातून यशस्वी झालेल्या संघांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. यामध्ये 14 वर्षाखालील वयागटातील मुलींच्या स्पर्धेत प्रथम पुणे संघ, द्वितीय मुंबई, तृतीय नागपूर तसेच मुलांमध्ये प्रथम कोल्हापूर, द्वितीय पुणे व तृतीय औरंगाबाद संघांने स्थान प्राप्त केले.

          17 वर्षाखालील वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत प्रथम मुंबई, द्वितीय पुणे, तृतीय नाशिक तसेच मुलांच्या संघामध्ये प्रथम पुणे, द्वितीय नागपूर व तृतीय औरंगाबाद, 19 वर्षाखालील वयोगटामध्ये मुलींच्या स्पर्धेत प्रथम मुंबई, द्वितीय पुणे, तृतीय कोल्हापूर तसेच मुलांमध्ये प्रथम मुंबई आणि द्वितीय नाशिक या संघांनी यश प्राप्त केले.

          कार्यक्रमाचे संचालन सचिन देवळे तर आभार प्रदर्शन गणेश जाधव यांनी मानले.

00000









No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...