43 शासकीय ग्रंथालयांना ई-सेवेत रुपांतर करणार
ग्रंथालय संचालक किरण धांडोरे

            अमरावती, दि.26 (जिमाका): ग्रंथालय संचालक, म.रा. मुंबई यांच्या वतीने येणाऱ्या काळात 18 कोटी निधी खर्च करुन 43 शासकीय ग्रंथालयांना ई-सेवा मध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अ वर्ग तसेच ब वर्ग वाचनालय ई-सेवेशी जोडले जातील. हा उपक्रम पुढील 6 वर्षात पुर्ण केला जाईल,असे प्रतिपादन म.रा. मुंबई चे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी केले.
राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान व ग्रंथालय संचालनालय (म.रा.), जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अमरावती कार्यालयाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. अध्यक्ष स्थानी ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, विशेष अतिथी म्हणुन मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, अप्पर कोषागार अधिकारी ग. म. चौधरी, सहायक क्षेत्रीय अधिकारी दिपांजन चॅटर्जी, डॉ. महेंद्र मेटे, ग्रंथालयाचे कार्यवाह राम देशपांडे, सहायक ग्रंथालय संचालिका मिनाक्षी कांबळे, शासकीय विभागीय ग्रंथपाल राजेश पाटील तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ. वा. सुर्यवंशी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणातुन मनोगत व्यक्त करतांना किरण धांडोरे म्हणाले कि, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार ज्या प्रमाणे मंदीरामध्ये भक्तांच्या रांगा लागतात. त्याचप्रमाणे ग्रंथालयातही वाचकांच्या, अभ्यासकांच्या संशोधकांच्या रांगा लागल्या पाहिजेत. त्यासाठी सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  
या कार्यक्रमास उद्घाटन प्रसंगी भाषणात देशातील विविध सांस्कृतीचा ठेवा आजही ग्रंथालयाच्या माध्यमातुन जतन करुन ठेवण्यात आला आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ. वा. सुर्यवंशी यांनी प्रस्ताविकामध्ये सार्वजनिक ग्रंथालय ही जनतेचे विद्यापीठ असुन नागरीकांना सुसज्ज व समृद्ध समाज घडविण्याचे कार्य करत आहे. तसेच राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या कडुन राबविण्यात येणाऱ्या समान व असमन अर्थसहाय्याच्या विविध योजनांचा लाभ सार्वजनिक ग्रंथालयानी घ्यावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाताकडुन राबविण्यात येणाऱ्या समान व असमान अर्थसहाय्याच्या विविध योजनांची माहिती, सार्वजनिक ग्रंथालयासाठी आवश्यक ग्रंथ, फर्निचर, दृक-श्राव्य माध्यमे, इमारतीचे नुतनीकरण, दुरुस्ती, संगणक, झेरॉक्स, प्रिंटर, बालविभाग कॉनर्र, दिव्यांगासाठी विशेष कक्ष, महिला, ज्येष्ठ नागरिक विभाग, ग्रंथ प्रदर्शने, व्याख्यान, कार्यशाळा या सारख्या अनेक बाबींसाठी प्रतिष्ठानतर्फे समान व असमान निधी योजनेतंर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले जाते या सर्व अर्थसहाय्याच्या योजनांची माहिती दिपांजन चॅटर्जी, सहायक क्षेत्रीय अधिकारी यांनी दिली.
सहायक ग्रंथालय संचालिका मिनाक्षी कांबळे व विभागीय ग्रंथपाल राजेश पाटील यांनी सार्वजनिक ग्रंथालयाच्या समस्या व उपाय यावर माहिती दिली. सुत्र संचालन मयुर चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वानखडे निरीक्षक, ढाकणे, सं. रा. कंडारकर क. लि. यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अ. वा. सुर्यवंशी यांनी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती