पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत कर्जासाठी
संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

          अमरावती, दि.26 (जिमाका): पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेंतर्गत सन 2016-17 या आर्थिक वर्षाकरीता अनुसुचित जाती/जमाती प्रवर्गातील ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जासाठी कार्यबल समितीची बैठक दि. 30 सप्टेंबर 2016 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर योजनेतंर्गत उद्योग करीता रु. 25 लाख व सेवा उद्योगाकरीता रु. 10 लाखापर्यत पात्र व सक्षम प्रकल्पांना बँकामार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत असुन शासनाकडुन प्रवर्ग निहाय 35 टक्के पर्यत अनुदान देण्यात येते.
          सदर योजनेतंर्गत अर्ज करण्यास इच्छुक सुशिक्षीत बेरोजगार युवक/युवतींनी www.kviconline.gov.in या संकेत स्थळावर लॉगऑन करुन PMEGP ePortal वर Online अर्ज सादर करावे, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र.985                                                                            दिनांक 26-09-2016
धामणगांव रेल्वे येथे दि.22 ते 29 सप्टेंबर पर्यत
सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यत जड वाहनास प्रवेश बंदी
          अमरावती, दि.26 (जिमाका): धामणगाव रेल्वे शहरात जड वाहतुकीची रहदारी समस्या मोठ्या प्रमाणात आहे. ही समस्या पाहता जिल्हा दंडाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशान्वये दि. 22 ते 29 सप्टेंबर पर्यत धामणगांव रेल्वे शहरात सकाळी 7 वा. ते रात्री 8 वाजेपर्यत जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
धामणगाव रेल्वे येथील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच गावातील लोक वाहनांचा वापर करतात. याशिवाय रेल्वे यार्ड मधुन दिवसभर 70 ते 80 ट्रक विविध मार्गाने शहराबाहेर पडतात. अशा वेळेस जड वाहतुकीने किंवा इतर वाहतुकीने किरकोळ /गंभीर अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. तसेच नगर परिषद, धामणगांव रेल्वे यांनी 4 ऑगस्ट 2015 रोजी विशेष ठराव क्र. 4 नुसार जड वाहनास प्रवेश बंदी असावी, असे मत व्यक्त केले होते. त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 33(1) (ब) तसेच मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये जड वाहनास प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा दंडाधिकारी किरण गित्ते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती