Posts

Showing posts from July, 2019

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कार्यशाळा अधिकाधिक शेतकरी उत्पादक कंपन्या व बचत गटांचा समावेश करावा -जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
अमरावती, दि. २७ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची अंमलबजावणी अधिक परिणामकारकपणे होणे आवश्यक आहे. योजनेत अधिकाधिक शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटाचा समावेश करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल येथे दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात आयोजित पोकरा कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी अनिल इंगळे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  श्री. नवाल म्हणाले की, पोकराची अंमलबजावणी भरीव पणे होण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट यांना अधिक प्रोत्साहन द्यावे. अवजारे, शेड, रेफर वाहन, प्राथमिक प्रक्रिया एकत्रिकरण केंद्र, गोदामे, स्वच्छता प्रतवारी गृह आदींसाठी अनुदान  उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी बचत गट, शेतकरी कंपन्या यांना प्रोत्साहित करावे. महिला आर्थिक विकास महामंडळ, जीवनोन्नती अभियान याद्वारे ग्रामविकासाच्या दृष्टीने कृषी पूरक उद्योग व व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न व्हावा.  यावेळी उपस्थित मार्गदर्शक तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यासह कृषी विभागाचे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ संपर्क साधावा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
                       अमरावती, दि. २७ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान योजना) योजनेत पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हा सूचना विज्ञान केंद्राच्या (nic) संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून, योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. अद्यापही लाभ    न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांनी तत्काळ तलाठी, कृषी सहायक यांच्याशी आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची व्याप्ती वाढली असून अनेक शेतकरी बांधवांना त्यामुळे लाभ मिळणार    आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी गावात ही प्रसिध्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी केले आहे. योजनेच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल व कृषी प्रशासनाला दिले आहेत.            शेतकऱ्यांना थेट मदत व्हावी यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशभरात राबविण्यात येत असून योजने अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार

जिल्हा नियोजनच्या नाविण्यपूर्णमधून महिलांचा विकास करणार - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे

Image
अमरावती, दि. 27 : महिलांचा विकास झाल्यास देशाचा विकास होतो. त्यामुळे महिलांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन व विकास निधीमधील नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करुन देऊ. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांचा विकास करणारे उपक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.   वरूड येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आज वार्षिक सर्वसाधारण सभा आणि महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य अंजली तूमराम, सरपंच स्वाती आंडे,उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपूते, तालुका कृषी अधिकारी अजय यादवकर, जिल्हा समन्वयक खुशाल राठोड, डॉ. वसूधा बोंडे आदी उपस्थित होते. डॉ. बोंडे म्हणाले, माविमच्या माध्यमातून महिलांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. महिलांची आर्थिक प्रगती होण्यासाठी त्यांना माफक दरात कर्ज पूरवठा करण्यात येत आहे. महिलांवर दाखविलेला विश्वास महिलांनी कर्ज पूर्ण परतफेड करुन खरा करून दाखविला आहे. महिलांच्या या प्रतिसादामुळे वरूड येथे कापडी पिशवी बनविण्याचा कारखाना सुरू करण्यात येत आहे. या ठिकाणी दोनशे महिलांना

जिल्हा नियोजनच्या नाविण्यपूर्णमधून महिलांचा विकास करणार - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे

Image
अमरावती, दि. 27 : महिलांचा विकास झाल्यास देशाचा विकास होतो. त्यामुळे महिलांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन व विकास निधीमधील नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करुन देऊ. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांचा विकास करणारे उपक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.   वरूड येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आज वार्षिक सर्वसाधारण सभा आणि महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य अंजली तूमराम, सरपंच स्वाती आंडे,उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपूते, तालुका कृषी अधिकारी अजय यादवकर, जिल्हा समन्वयक खुशाल राठोड, डॉ. वसूधा बोंडे आदी उपस्थित होते. डॉ. बोंडे म्हणाले, माविमच्या माध्यमातून महिलांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. महिलांची आर्थिक प्रगती होण्यासाठी त्यांना माफक दरात कर्ज पूरवठा करण्यात येत आहे. महिलांवर दाखविलेला विश्वास महिलांनी कर्ज पूर्ण परतफेड करुन खरा करून दाखविला आहे. महिलांच्या या प्रतिसादामुळे वरूड येथे कापडी पिशवी बनविण्याचा कारखाना सुरू करण्यात येत आहे. या ठिकाणी

पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात शासनाचा उपक्रम मुलींना कणखर करण्यासाठी स्वयंसिद्धा प्रशिक्षण कार्यक्रम

Image
अमरावती, दि. 26    युवतींना शारीरीक व मानसिकदृष्ट्या कणखर बनविण्यासाठी कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यातून प्रारंभीच्या टप्प्यात सुमारे 80 हजार मुलींना कराटे, लाठीकाठी व मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.    पालकमंत्री डॉ. बोंडे यांनी या उपक्रमाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांना आज दिली. आमदार रमेश बुंदिले, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलिस आयुक्त संजय बाविसकर, पोलीस अधिक्षक हरी बालाजी, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते. उपक्रमाबाबत बोलताना डॉ. बोंडे म्हणाले की, युवतीवर हल्ला होऊन तिचा बळी जाण्याची दुर्देवी घटना जिल्ह्यात घडली. अशा घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने विविध विभागांच्या समन्वयातून स्वयंसिद्धा हा उपक्रम जिल्हाभर राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुलींमध्ये स्वसंरक्षणाची जाणिव निर्माण करण्याचा उपक्रमाचा हेतू आहे. उपक्रमात 29 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक शाळेच्या 2 मुली व क्रीडा शिक्षक मिळू

500 हेक्टरवर सर्वाधिक कडुनिंबझाडांच्या लागवडीचे ध्येय शेतकऱ्यांना कडुनिंबाचे सेंद्रिय कीटकनाशक उपलब्ध करून देण्यासाठी निम पार्क पायलेट प्रोजेक्ट - कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे

Image
* 500 हेक्टर जागेवर जास्तीत जास्त निम वृक्ष लागवडीचे उद्धिष्ट * निंबोळी तेलाच्या उत्पादनासाठी पायलट प्रोजेक्ट * 33 कोटी वृक्ष लागवडीच्या ध्येयाला मोठा हातभार मुंबई, दि.24 :- राज्यातील शेतकऱ्यांना कडुनिंबाचे सेंद्रिय कीटकनाशक उपलब्ध करून देण्यासाठी विविध तालुक्यांमध्ये निम पार्क तयार करण्यात येणार असून पायलेट प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 500 हेक्टर रिक्त जागेवर सर्वाधिक कडुनिंबाच्या झाडांची लागवड करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या पासून बनणाऱ्या निंबोळी तेलाचा शेतकऱ्यांना    निश्चितच मोठा फायदा होईल असे प्रतिपादन कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी आज येथे केले. मंत्रालयात निम पार्क तयार करण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजना बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. कडुनिंबाच्या उत्कृष्ट वापराबाबत अधिक माहिती देताना कृषिमंत्री डॉ. बोंडे म्हणाले, निमझाडांची रोपवाटिका तयार करून वृक्षलगवडीसाठी सर्वप्रथम जिल्हास्तरावर उपलब्ध रिक्त जागेची पाहणी करण्यात यावी. त्यासोबतच ज्या निम झाडांमधून दर्जेदार व मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल व जी प्रजाती म

खरीप हंगाम: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी 29 जुलै पर्यंन्त मुदतवाढ - कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

Image
मुंबई, दि. 24: खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग होता यावे यासाठी दि. 29 जुलै पर्यंत योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती    कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिली.               योजनेत सहभागी होण्यासाठी    बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज बँक व `आपले सरकार सेवा केंद्र` (डिजीटल सेवा केंद्र) येथे स्विकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी    विहित मुदतीपुर्वी नजिकची बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा. याबाबत अधिक माहितीसाठी विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे. 00000

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कोंडेश्वर येथील जागा निश्चित - कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे

Image
मुंबई, दि. 23 : अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या असून कोंडेश्वर येथील जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चित करण्यात आली असल्याचे कृषीमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी सांगितले. अमरावती जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.बोंडे बोलत होते. `अमरावती जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार कोंडेश्वर येथील जागा निश्चित झाली असून वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने तातडीने प्रस्ताव तयार करावा, असे निर्देशही डॉ.बोंडे यांनी दिले. वाळलेल्या संत्रा झाडांना अनुदान ज्या शेतकऱ्यांचे संत्र्यांचे झाड पाण्याअभावी वाळून गेले असेल अशा शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेंतर्गत मदत देण्यात येणार आहे, असेही डॉ.बोंडे यांनी सांगितले. यावेळी सर्वश्री आमदार रवी राणा, रमेश बुंदिले, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.तात्याराव लहाने, उच्

रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी एका आठवड्यात समिती गठीत करा - कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे

Image
मुंबई, दि. २३ :- अमरावती येथील मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे मराठी विद्यापठाची स्थापना करण्यासाठी एका आठवड्यात समिती गठीत करा, असे निर्देश कृषिमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी यावेळी दिले. मंत्रालयात आज रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्याच्या प्रलंबित प्रश्नाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव धकाते, अखिल भारतीय महानुभाव महामंडळाच्या अध्यक्षा अॅड तृप्ती बोरकुटे, उपाध्यक्ष रमेश आमदारे, महासचिव उमेश ठाकरे त्याचबरोबर उच्च तंत्र शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती देताना पालकमंत्री डॉ बोंडे म्हणाले, रिद्धपुरमध्ये मराठी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी गठीत केलेली समिती रिद्धपुर येथे भेट देऊन उपलब्ध जागा व मान्यतेसाठी आवश्यक इतर बाबींची पूर्तता करून अहवाल सादर करणार आहे. मागील वर्षी उच्च तंत्र शिक्षण सचिव स्तरीय समितीने रिद्धपुरमध्ये भेट देऊन अहवाल तयार केला होता. त्या समितीचा प्राप्त अहवाल ग्राह्य धरून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.    मराठी विद्यापीठ स्थापनेचा प्रश्न अने

'जय महाराष्ट्र' व दिलखुलास' मध्ये कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे

Image
मुंबई , दि  22 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित  ' जय महाराष्ट्र '  व  ' दिलखुलास '  कार्यक्रमात  ' आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध शेती ' या विषयावर कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांची विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दि.  23  जुलै रोजी संध्याकाळी  7.30 वाजता प्रसारित होणार आहे. तसेच  ' दिलखुलास '   या कार्यक्रमात राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर  बुधवार दि. 24,  गुरूवार दि. 25  व  शुक्रवार दि.  26  जुलै  2019  रोजी सकाळी  7:25  ते  7 :40  या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे  यांनी ही मुलाखत घेतली आहे. खरीप हंगाम पेरणी ,  पीक कर्जपुरवठा बाबत माहिती ,  खरीप हंगामासाठी बी-बियाणे ,  खताबाबत  नियोजन ,  शेतीशाळांचा उपक्रम ,  कृषी क्षेत्रातील गुंतवणूक तसेच कृषी विभागामार्फत खते ,  बियाणे ,  शेतीचं  यांत्रिकीकरण ,  पीक विमा योजना आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.बोंडे यांनी  ' जय महाराष्ट्र '  व   ' दिलखुलास '  कार्यक्रमातून दिली आहे.

राज्यातील पहिल्या स्फुरद समृद्ध खत निर्मिती कारखान्याचे भूमिपूजन एका वर्षात उत्पादन सुरू करावे - कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे

Image
अमरावती, दि. २२ : प्रॉम खत निर्मिती कारखान्यामुळे जैविक खत निर्मितीसह पर्यावरणही जपले जाईल व रोजगारालाही चालना मिळेल. एका वर्षात हा कारखान्यातून उत्पादन सुरू व्हावे, असे निर्देश  राज्याचे कृषी मंत्री तथा राज्य कृषी उद्योग महामंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी आज मायवाडी येथे दिले. मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे संत्रा प्रक्रिया केंद्रात महाराष्ट्रातील पहिल्याच शासकीय कृषी उद्योग प्रॉम (फॉस्फेट रिच ऑरगॅनिक मॅन्युअर) व निंबोळी अर्क/ पेंड प्रकल्पाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. मोर्शीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम , श्रीमती वसुधाताई बोंडे, महामंडळाचे संचालक पियूष कारंजकर, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक दिलीप ब्राह्मणकर   , उद्योजक संजय जाधव  आदी उपस्थित होते.   प्रारंभी कृषी मंत्र्यांनी ड्रोनद्वारे फवारणीची प्रात्यक्षिक पाहणी केली.  डॉ. बोंडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्री पदाची जबाबदारी दिली. हा केवळ माझा नसून मोर्शी वरुडमधल्या जनतेचा बहुमान आहे. कृषी क्षेत्रातील विविध बाबींच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योज
Image
अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाची भेट              मुंबई ,   दि. 20 :- भारतात हजारो वर्षांपासून कडूनिंबाचा सेंद्रिय    कीटकनाशक म्हणून प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांनी देखील कडूनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर केला तर त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल असे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी आज येथे सांगितले. मंत्रालयात अर्जेंटिनाचे कृषीउद्योग सचिव डॉ. ल्युईस ईचलव्हेअर यांच्या समवेत पाच जणांच्या शिष्टमंडळाने आज कृषिमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.              ते म्हणाले ,   भारतात रासायनिक कीटकनाशकासाठी उत्तम पर्याय म्हणून कडुनिंबाचा वापर करण्यात येतो. त्याचा अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांना फायदा होईल. आपण दोन्ही देशातील शेतीशी निगडित विविध पद्धतींचे अवलोकन करून त्यांची देवाणघेवाण केली तर त्याचा दोन्ही देशांना नक्कीच फायदा होईल. दोन्ही देशातील हंगामी शेती उत्पादन वेगवेगळ्या कालावधीत होते. जेव्हा एखादा हंगाम संपतो त्यावेळी निर्यातीच्या माध्यमातून दोन्ही देशात दर्जेदार हंगामी फळे ,   अन्नधान्य , तेलबिया ,   बियाणे उपलब्ध होऊ शकतात. या माध्यमातून दोन्ही देशातील

शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा - कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे

Image
कोल्हापूर ,   दि.   18  ( जिमाका) : बोगस बियाणे आणि खते पुरवून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा. त्यांना काळ्या यादीत टाका. या कामात कुचराई केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल केले जातील ,   असा इशारा कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिला.              येथील शासकीय विश्रामगृहात राजर्षी शाहू सभागृहात कोल्हापूर ,   सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांची कृषी विषयक योजनांची सविस्तर आढावा बैठक कृषी मंत्री डॉ. बोंडे यांनी आज घेतली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक ,   आमदार अमल महाडिक ,   आमदार शिवाजीराव नाईक ,   जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.              विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे यांनी संगणकीय सादरीकरण करून विविध योजनांची माहिती दिली. कृषी मंत्री डॉ. बोंडे म्हणाले ,   जिल्ह्यातील जमिनींची प्रत टिकवू न ठेवण्यासाठी मृद संधारणाचे काम हाती घ्यावे. कृषी विद्यापीठ , कृषी विभाग ,   साखर आयुक्तालय ,   साखर कारखाने या सर्वांनी एकत्र येवून मृद संधारणाचा आराखडा तयार करावा. यामध्ये 100   टक्के ठिबकवर शेती ,   शेतीचा फेरपालट ,   जमिनीत कर्ब का