पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याकडून विविध बाबींचा आढावा







अमरावती, दि. 5 :  शासकीय कार्यालयांत अनेक कामे प्रलंबित राहतात, असा अनुभव आहे. त्यामुळे अनेक चांगल्या योजनांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. हे टाळण्यासाठी प्रशासनाने गतीने व संवेदनशीलपणे काम करावे व एकही प्रकरण प्रलंबित राहू नये, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिले. 
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन हे निर्देश दिले. ते म्हणाले की, नागरिकांचे एकही काम प्रलंबित राहू नये, यासाठी सर्व कार्यालयांत  झीरो पेंड्सी उपक्रम   राबविण्यात येईल.  सर्व अधिकाऱ्यांनी आपल्याकडील  कामे व जबाबदाऱ्या याबाबत सादरीकरण करावे. मी 14 किंवा 15 जुलैला आढावा घेणार आहे.अधिकारी उदासीन राहिल्यास अनेक चांगल्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यासाठी नवे शासन निर्णय, योजना यांची वेळीच व गतीने अंमलबजावणी झाली पाहिजे. नागरिकांच्या प्रत्येक अर्जावर वेळेत कार्यवाही करावी. 
जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि प मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती