Thursday, July 4, 2019

श्री रिद्धपुर व बऱ्हाणपूर येथील कृषी सहायक कार्यालयाचे उदघाटन रिद्धपूर मराठी विद्यापीठासाठी शासन सकारात्मक - कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे









अमरावती, दि. ४ : अडीचशे कोटी रुपयांच्या श्री क्षेत्र रिद्धपूर विकास आराखड्या तून गावाचा कायापालट होणार असून, शुद्ध पाणी पुरवठा यंत्रणा, थीम पार्क यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. येथे मराठी विद्यापीठ होण्यासाठी ही शासन सकारात्मक आहे, असे 
कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज रिद्धपुर येथे सांगितले.
मोर्शी तालुक्यातील श्री रिद्धपुर येथील ग्रामपंचायतीत कृषी सहायक कार्यालयाचे उदघाटन कृषी मंत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी  रिद्धपूर येथील राजमठाला भेट देऊन दर्शन घेतले व  रिद्धपुर विकास आराखडा कामांच्या अनुषंगाने चर्चा केली. महंत वाईनदेशकर बाबा, महंत यक्षदेवबाबा,  जि. प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, श्रीमती वसुधाताई बोंडे, जि. प. सदस्य सारंग खोडस्कर, सरपंच गोपाल जामठे , प्रमोद हरणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे आदी उपस्थित होते. 
कृषी मंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, शासनाने समाजाच्या सर्व घटकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतले आहे. जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी यांत्रिकी करण, शेततळे अशा अनेकविध योजना अंमलात आणल्या आहेत. कृषी प्रशासनाने  अधिकाधिक शेतकरी बांधवांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा. 
रिद्धपुर विकास आराखड्यानुसार गावाचा कायापालट होत आहे. गावात स्वच्छता, योग्य पद्धतीने जल वितरण आदी जबाबदारी सर्वांनी समनवयाने पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

कृषी मंत्र्यांचा मुलांशी दिलखुलास संवाद; सोडवला बसचा प्रश्न

तत्पूर्वी कृषी मंत्र्यांच्या हस्ते मोर्शी तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील कृषी सहायक कार्यालयाचे उदघाटन झाले.
कृषी मंत्री डॉ. बोंडे यांनी यावेळी उपस्थित मुलांशी दिलखुलास संवाद साधला. मुलींनी आम्हाला रिद्धपूर ला शाळेत जाण्यासाठी बस नसल्याचे सांगताच कृषी मंत्र्यांनी तत्काळ एस टी विभागीय नियंत्रकांना फोन करून बस सुरू करण्याचे निर्देश दिले. गावात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. घरकुलांचे काम पूर्ण करावे. कृषी सहायक यांनी कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहावे व स्वतः चा भ्रमण ध्वनी क्रमांक ही फलकावर ठळकपणे नमूद करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...