Posts

Showing posts from July, 2022

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

  विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी अमरावती दि.1 (विमाका) :   विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि.   1  ऑगस्ट 2022   रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे. विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.24), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (397.39), अरुणावती (329.28), बेंबळा (266.55), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.71), वान (405.20), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.55), पेनटाकळी (556.90), खडकपूर्णा (519.44). मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (443.10), चंद्रभागा (502.70), पूर्णा (448.22), सपन (507.45), पंढरी (426.70), गर्गा (344.50), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.78), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील    निर्गुणा (390.70), मोर्णा (366.20), उमा (343.25),

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

  विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी अमरावती दि. 31 ( विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 31 जुलै 2022 रोजी सकाळी            7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे. विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा ( 341.24), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प ( 397.26), अरुणावती ( 329.19), बेंबळा ( 266.55), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ( 346.89), वान ( 405.10), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा ( 290.53), पेनटाकळी ( 556.80), खडकपूर्णा ( 519.28) मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर ( 442.92), चंद्रभागा ( 502.60), पूर्णा ( 448.14), सपन ( 507.30), पंढरी ( 426.70), गर्गा ( 344.50), बोर्डीनाला ( 362.00), यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस ( 304.79), सायखेडा ( 272.50), गोकी ( 315.70), वाघाडी ( 318.60), बोरगांव ( 319.00), नवरगांव ( 254.10), अकोला जिल्ह्यातील   निर्गु

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे आजपासून खादी उत्सव

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे आजपासून खादी उत्सव अमरावती , दि. ३१ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व कस्तुरबा सोलर खादी महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ते १५ ऑगस्ट दरम्यान शहरातील तापडिया सिटी सेंटरमधील तिसऱ्या   मजल्यावर खादी उत्सव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते उद्या , दि. १ ऑगष्ट रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे , अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी आज दिली. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत अमरावती जिल्ह्यात मागील पाच वर्षापासून विकेंद्रित सोलर चरखा समूह कार्यक्रम हा नाविन्यपुर्ण पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील २१ गावांमध्ये अडीचशे महिलांना सौर चरखे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.   कस्तुरबा सोलर खादी महिला समितीमार्फत अमरावती जिल्हयातील शेतकऱ्यापासून कापूस खरेदी करून त्यापासून कच्चा माल तयार करतात. विविध गावातील चरख्यावर सुत कताई करून त्यापासून सौर खादी

अमरावती विभागात जूनपासून आतापर्यंत 501.4 मिमि पावसाची नोंद विभागात सरासरी 3.8 मि.मि. पाऊस

  अमरावती   विभागात जूनपासून आतापर्यंत 501.4 मिमि पावसाची नोंद विभागात सरासरी 3.8 मि.मि. पाऊस   अमरावती दि 31 (विमाका) :   अमरावती विभागातील 56 तालुक्यात पाऊस झाला. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या  ‘ महावेध ’ च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत विभागात सरासरी 3.8 पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 501.4 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे. विभागात नोंदला गेलेला आजचा तालुका निहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मिटर परिमाणात आहेत. ही माहिती  ‘ महावेध ’ च्या नोंदीनुसार दुपारी बारावाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात. अमरावती जिल्हा   : धारणी 0.0 (492.7), चिखलदरा 0.0 (789.9), अमरावती 3.0 (419.8), भातकूली 3.8 (341.2), नांदगाव खडेश्वर 1.8 (520.0), चांदूर रेल्वे 8.8 (448.9), तिवसा 4.2 (597.4), मोर्शी 1.0 (521.2), वरुड 1.3 (548.3), दर्यापूर 1.0 (324.9), अंजनगाव 0.0 (385.3), अचलपूर 0.3 (375.4), चांदूरबाजार 6.9 (560.6), धामणगाव रेल्वे 2.4 (624.6) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासां

'हर घर तिरंगा' उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे आवाहन

Image
  ' हर घर तिरंगा ' उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे आवाहन   अमरावती , दि. ३१ : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ' हर घर तिरंगा ' उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्ट या काळात राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा डौलाने फडकावा , यासाठी सर्व नागरिकांनी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे , असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनातस्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात , स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक , क्रांतिकारक , स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे , तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी या उद्देशाने या देदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि. १३   १५ ऑगस्ट या कालावधीसाठी ' हर घर तिरंगा ' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

महिलांमध्ये आर्थिक सक्षमीकरणाबाबत सकारात्मकता निर्माण करावी - प्रधान सचिव मनीषा वर्मा

Image
  महिलांमध्ये आर्थिक सक्षमीकरणाबाबत सकारात्मकता निर्माण करावी -           प्रधान सचिव मनीषा वर्मा ‘आकांक्षा कौशल्यातुन जीवनोन्नतीकडे..’ सामंजस्य करार            अमरावती दि. 29 (विमाका):   रोजगाराविषयी प्रशिक्षणाचा कालावधी पुर्ण करुन रोजगार प्राप्त होईपर्यंत सहभागी महिला प्रशिक्षणार्थींचे सातत्याने समुपदेश करावे. प्रेरणादायी सत्र, उद्योजक कंपन्यांचे भरती मेळावे व विषय तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे नियमीत आयोजन करावे. प्रशिक्षणानंतर रोजगार प्राप्त होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याबाबत सकारात्मकता या महिलांमध्ये निर्माण करावी, अशा सुचना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा यांनी दिल्या. आकांक्षा कौशल्यातुन जीवनोन्नतीकडे कार्यक्रमातंर्गत अमरावती व नागपुर विभागातील युवती व महिलांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणाऱ्या प्रशिक्षण प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनी व नवगुरुकुल फाऊंडेशन फॉर सोशल वेलफेअर, दिल्ली यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज सा

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

  विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी अमरावती दि.29 (विमाका) :   विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि.   29 जुलै 2022   रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे. विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.18), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (396.84), अरुणावती (328.95), बेंबळा (266.45), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.56), वान (404.90), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.50), पेनटाकळी (556.75), खडकपूर्णा (519.0). मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (442.44), चंद्रभागा (502.40), पूर्णा (448.53), सपन (507.65), पंढरी (426.70), गर्गा (344.70), बोर्डीनाला (362.25),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.76), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील    निर्गुणा (390.50), मोर्णा (365.80), उमा (343.15),

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आवश्यक सुविधा द्याव्या - आशिष बिजवल

Image
  कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आवश्यक सुविधा द्याव्या -           आशिष बिजवल जिल्हा कृती दलाच्या बैठकित दिले निर्देश              अमरावती दि. 28 (विमाका):   कोविड काळात अनाथ झालेल्या बालकांना कायदेशिर हक्क व आवश्यक न्यायिक मदत मिळावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व महिला व बालविकास विभागाने समन्वयाने कार्यवाही   करावी. या बालकांना शैक्षणिक व आरोग्यविषयक सुविधेचा तात्काळ लाभ द्यावा असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी दिले. जिल्हा कृती दलाच्या माध्यमातुन कोविड-१९ आपत्तीमध्ये अनाथ झालेल्या बालकांच्या संरक्षण व संगोपनासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा श्री बिजवल यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. महिला व बालकल्याण उपायुक्त नरेंद्र वानखडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उमेश टेकाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) कैलास घोडके, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अतुल भडांगे, राजश्री कौलखेडे, मंगल पंचाळ, माविमचे जिल्हा समन्वयक सुनिल सोसे, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी अजय डबले, परिविक्षा अधिकारी सुभाष अक्वार, जिल्हा संर

जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या सोडतीमध्ये 66 जागांपैकी 33 जागा महिलांसाठी आरक्षित

Image
  जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या सोडतीमध्ये 66 जागांपैकी 33 जागा महिलांसाठी आरक्षित     अमरावती, दि.28 : अमरावती जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणूकीव्दारे गठित होणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम राबविण्यात आला असून यात 66 जागांपैकी 33 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभाग (गट-66 साठी) ही आरक्षण सोडत नियोजन भवन येथे काढण्यात आली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, निवडणूक शाखेचे प्रमोद देशमुख तसेच विविध गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडली. प्रारंभी गावांची नावे नमूद असलेली प्रत्येक चिठ्ठी उपस्थितांना दर्शवून नंतर पारदर्शी डब्यात सर्वांसमोर त्याची सरमिसळ करुन जय संदीप राहटे व रुचल मिलींद गंधाडे या बालकांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानंतर संबंधित गावाचे नाव   जाहीर करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सदस्य पदासाठी चिखलदरा, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, तिवसा, अमरावती, अचलपूर, धारणी, अंजनगाव सुर्जी, दर्

संकटग्रस्त महिलांना वन स्टॉप क्रायसेस सेंटरचा आधार

  संकटग्रस्त महिलांना वन स्टॉप क्रायसेस सेंटरचा आधार            अमरावती, दि.28: संकटात सापडलेल्या महिलांना काळजी व संरक्षणाची गरज असते. अशा गरजू महिला, मुलींनी वन स्टॉप क्रायसेस सेंटरची गरजेच्या वेळी मदत घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.            हुंडाबळी, ऑनर किलींग , ॲसिड हल्ला , लैंगिंक छळ, बाल लैगिंक छळ, लैगिंक व्यापार, बाल विवाह, भ्रूणहत्या, सती प्रथा, कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिला अशा संकटात सापडलेल्या महिलांसाठी वन स्टॉप क्रायसेस सेंटर मदतनीस ठरते. या योजनेमध्ये एका छताखाली वैद्यकीय सुविधा, पोलिस मदत केंद्र, समुपदेशन केंद्र, कायदेशीर मदत, अन्न, वस्त्र, निवारा मोफत पुरविण्यात येतो.          जिल्हा स्त्री रुग्णलाय, येथे दिनांक 1 जून 2017 पासून वन स्टॉप क्रायसेस सेंटर कार्यरत आहे. या केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षेतेखाली या सेंटरची   त्रैमासिक बैठक आयोजित करून आढावा घेण्यात येतो. वन स्टॉप क्रायसेस सेंटरची आढावा बैठक नुकतीच पार पडली. हे सेंटर स

अग्निपथ योजनेतंर्गत सैन्य भरतीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 3 ऑगस्टपर्यंत

  अग्निपथ योजनेतंर्गत सैन्य भरतीसाठी   अर्ज भरण्याची अंतिम मुदत 3 ऑगस्टपर्यंत        अमरावती, दि.28: अग्निपथ योजनेंतर्गत होतकरू सुशिक्षित अविवाहित तरूणांसाठी सैन्य भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 3 ऑगस्ट 2022पर्यंत आहे. सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन दिनांक 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2022 या कालावधीत करण्यात येणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात (बुलडाणा सोडून) ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. स्टेट रिझर्व पोलिस फोर्स, ग्रुप 4, नागपूर येथे या भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नागपूर भरती कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.           इच्छुक उमेदवारांनी www.joiniindianarmy.nic.in या वेबसाईटवर लॉग-इन करून ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. दिनांक 10 ऑगस्ट 2022 पासून ई-मेलव्दारे प्रवेशपत्र पाठविण्यात येणार आहे. त्या प्रिंट आऊटसह भरतीच्या ठिकाणी दिलेल्या तारखेस व वेळेत संबंधित उमेदवारांनी पोहचणे आवश्यक आहे. तरी या योजनेचा जास्तीत-जास्त युवकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालय, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मनिषकुमार गायक

कुमाऊ रेजिमेंटचे कमांड अधिकारी कर्नल अक्षय सुरेश भगत यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार

  कुमाऊ रेजिमेंटचे कमांड अधिकारी कर्नल अक्षय सुरेश भगत यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार               अमरावती, दि.27: कुमाऊ रेजिमेंटचे कमांड अधिकारी कर्नल अक्षय सुरेश भगत हे जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात कार्यरत असतांना साहसी पराक्रमासाठी त्यांना महामहिम राष्ट्रपती यांनी दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी ‘सेना मेडल ’   प्रदान करून त्यांच्या गौरव केला. त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार ’ जाहीर केला. कर्नल अक्षय सुरेश भगत सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सेवारत असल्यामुळे त्यांचे वडील सुरेश भगत यांना जिल्हा सैनिक अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या हस्ते नुकतेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार, बारा लाख रूपयांचे रोख पारितोषक प्रदान करण्यात आले. कुमाऊ रेजिमेंटचे कमांड अधिकारी कर्नल अक्षय सुरेश भगत हे जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात कार्यरत असतांना 28 सप्टेंबर 2020 रोजी त्यांना आतंकवादयासंबंधी गुप्त माहिती प्राप्त झाली. ते लगेच आपल्या बरोबर काही निवडक जवान घेवून स्वत: मोहिमेवर निघाले. त्यांनी योग्य योजना आखून ताबोडतोड त्याजागेला घेरले. परंतु

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवस साजरा   अमरावती, दि.27 : सैनिकी मुलींचे वसतीगृह येथे कारगिल विजय दिवस (26 जुलै) साजरा करण्यात आला. मेस्को अधिकारी मेजर जोशी, कारगील युद्धामध्ये भाग घेतलेले माजी हवालदार निर्मल कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीसह सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनेचे अध्यक्ष, माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यावेळी उपस्थित होते.   कार्यक्रमाच्या सुरवातीला दीप प्रज्ज्वलनानंतर दोन मिनिटे मौन बाळगून शहीद वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर वीर पत्नी व वीर माता यांचा साडी, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. माजी मेजर जोशी यांनी माजी सैनिक, वीर माता आणि वीर पत्नी यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. 00000  

‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’पॉवर @ 2047 चा शुभारंभ विविध मान्यवरांची उपस्थिती

Image
  ‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य ’ पॉवर @ 2047 चा शुभारंभ विविध मान्यवरांची उपस्थिती   अमरावती, दि.27 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि जिल्हा प्रशासनामार्फत ‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य ’ पॉवर @ 2047 या उर्जा महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. गेल्या आठ वर्षात उर्जा क्षेत्रातील देदिप्यमान कामगिरीचा वेध घेण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यात आज मोर्शी येथेही स्वतंत्र कार्यक्रम झाला. नियोजन भवनात शुभारंभ सोहळा झाला. आमदार सुलभाताई खोडके अध्यक्षस्थानी होत्या. आमदार प्रविण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड तसेच जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, सुनील राणा, महावितरण प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता महावितरण पुष्पा चव्हाण, मुख्य अभियंता पारेषण जयंत विके, उपव्यवस्थापक दीपक जैन, मयुर मेंढेकर, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, दीपक देवहाते, सुनील शेरेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अर्थचक्राला गती देण्यात ऊर्जेची भूमिका महत्त्वाची - आमदार सुलभताई खोडके तंत्रज्ञानाच्या काळात विकासाच्या अर्थचक्र