Tuesday, July 12, 2022

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (मारोतराव उदयभानजी धानोरकर)

 

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन

(मारोतराव उदयभानजी धानोरकर)

 

            अमरावती, दि. 12:  येथील मारोतराव उदयभानजी धानोरकर  (वय 86 वर्षे, रा. अंबाविहार भामटे महाराज देवळामागे, लव्हाळे यांचे घर, अमरावती) ही व्यक्ती हरविल्याची फिर्याद खोलापुरीगेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

मारोतराव उदयभानजी धानोरकर हे दि.15 मे, 2022 रोजी दुपारी 12 वाजता अंबाविहार येथून घरी कोणालाही न सांगता घरून निघून गेले. शोध घेतला असता सापडले नाहीत. 

त्यांचा वर्ण निमगोरा, उंची पाच फूट 2 इंच, बांधा सडपातळ,  डोक्याचे व दाढीचे केस पांढरे असून दाढी वाढलेली आहे. उजव्या हातावर मारूतीची मूर्ती गोंदलेली असुन छातीवर डाव्या बाजुस मस आहे. घरून जातेवेळी अंगात पांढऱ्या रंगाची सुताची बांडिस, पांढऱ्या रंगाचे धोतर, पांढऱ्या रंगाची टोपी घातलेली असुन पायात काळ्या रंगाची चप्पल आहे.

उपरोक्त वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी पोलीस स्टेशन खोलापुरी गेट, पोलीस ठाण्यात (0721)-2678133  या दूरध्वनी क्रमांकावर किंवा उमेश धानोरकर (मो. क्र.) ७४९८८४४१९३ यांच्याशी संपर्क साधावा.

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...