Tuesday, July 12, 2022

हातमाग विणकरांना समर्थ योजनेतून प्रशिक्षण

 

हातमाग विणकरांना समर्थ योजनेतून प्रशिक्षण

अमरावती, दि.12 : केंद्र शासनामार्फत समर्थ योजनेतून हातमाग विणकरांसाठी संस्थांच्या माध्यमातून कौशल्य विकास व प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. योजनेचा तपशील Samarth-textiles.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रशिक्षण संस्था, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, ट्रस्ट, कंपनी, इतर सेवाभावी संस्था व वस्त्रोद्योग विभागातील संस्थांनी हा कार्यक्रम राबवण्यासाठी नागपूर येथे प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 11-03-2026

  दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन अमरावती, दि. 11 (जिमाका):   राज्...