Monday, July 25, 2022

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम योजनेत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम योजनेत अर्ज करण्याचे आवाहन 

अमरावती, दि.25 : सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम राबवला जातो. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्रातर्फे करण्यात आले आहे.  

 

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) ही योजना दि. 1 ऑगस्ट 2019 पासून कार्यान्वित आहे. योजनेमध्ये 18 ते 45 वयोगटातील किमान 7 वी पास असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग सुरू करण्यासाठी 50 लाख रु. पर्यंत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध होण्याची सोय आहे. तसेच, यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक या प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादेत अधिक 5 वर्ष सवलत देण्यात आली आहे.

 

या ऑनलाईन योजनेमध्ये ग्रामीण व शहरी घटकांना 15 टक्के, 25 टक्के, 35 टक्यांपर्यंत अनुदानाची सुविधा आहे. या योजनेसोबतच केंद्र शासनाची पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) ऑनलाईन अनुदानित योजनाही राबवली जाते. इच्छूकांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा.

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...