शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

 

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 

मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

 

अमरावती, दि.21: अमरावती समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त मागासवर्गीय मुला-मुलींचे 24 शासकीय वसतिगृह कार्यरत आहेत. त्यामध्ये तालुकास्तरावर 15 व विभागीय स्तरावर 9 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. सन 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सामाजिक आरक्षणानुसार शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी पुढीलप्रमाणे टक्केवारी निर्धारित केली आहे. अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 3 टक्के, आर्थिकदृष्टया मागास 5 टक्के, विमुक्त जाती भटक्या जमाती 5 टक्के,  विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के, अपंग / दिव्यांग 3 टक्के, अनाथ 2 टक्के यानुसार प्रवेश निश्चित करण्यात येतील.

          सामाजिक आरक्षणानुसार रिक्त जागेबाबतची सविस्तर माहिती सबंधित गृहपाल यांच्याकडे उपलब्ध आहे. तालुक्यातील शासकीय वसतिगृहात 40 टक्के शालेय विद्यार्थी तर 60 टक्के कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी राखीव आहे. विभागीय स्तरावरील वसतिगृहामध्ये शालेय प्रवेशासाठी जागा रिक्त ठेवण्यात येत नाहीत. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना यात प्रवेश देण्यात येतो.

          सन 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता जिल्ह्यातील  24 शासकीय वसतिगृहामध्ये पुढीलप्रमाणे जागा रिक्त आहेत. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (47), गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह (54),  संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह (73), मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह(98), डॉ. बाबासाहेब आंबेडकर 125 वी जयंती वसतिगृह (90), गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (37), विभागस्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट क्र.1 (80), विभागस्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट क्र. 2 (90), विभागस्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट क्र.3(90), मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, अचलपुर (16), आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, धामणगांव रेल्वे (31), मागास तथा आर्थिक मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, वरुड (29), आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, तिवसा (20), मागास तथा आर्थिक मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, मोर्शी (31), मागास तथा आर्थिक मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, चांदुर बाजार (20), मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, चांदुर रेल्वे (35), डॉ.बाबासहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चांदुररेल्वे (27), डॉ. बाबासहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदगांव खंडेश्वर (16), डॉ. बाबासहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय  वसतिगृह, दर्यापुर (21), डॉ. बाबासहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, धारणी (40), डॉ. बाबासहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अचलपुर(26), प्रियदर्शनी मुलींचे शासकीय वसतिगृह,नांदगांव खंडेश्वर (20), मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, तिवसा (35), डॉ. बाबासाहेब आंबेडकर 125 वी जयंती वसतिगृह, दर्यापुर(37) अशा एकूण 1063 जागा रिक्त आहेत. रिक्त असलेल्या जागांसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सबंधित वसतिगृहाकडे सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी केले आहे.

00000

 

Comments

Popular posts from this blog

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती