सेवायोजन कार्डाला आधार क्रमांक जोडावा - कौशल्य विकास व रोजगार विभागाचे आवाहन

 

 सेवायोजन कार्डाला आधार क्रमांक जोडावा

-         कौशल्य विकास व रोजगार विभागाचे आवाहन

 

 

अमरावती, दि.25: ज्या उमेदवारांनी अद्याप सेवायोजन कार्यालयाकडील नोंदणीपत्राला आपले आधार कार्ड जोडले (लिंक) नसेल, त्यांनी ते दि. 15 ऑगस्टपूर्वी करून घ्यावे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राव्दारे राबविण्यात येणा-या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ते आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा रोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

  

 रोजगार विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन प्रोफाईलला आधार क्रमांक लिंक करण्याची कार्यवाही ऑनलाईन पध्दतीने पूर्ण करावी. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सर्व सेवा आता या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने पुरविण्यात येतात.

 

 

उमेदवारांना प्रामुख्याने विविध रोजगार मेळाव्याची माहिती मिळणे, संधीचा शोध घेण्यास मदत मिळणे, पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेत प्रशिक्षण घेणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती मिळणे, शैक्षणिक पात्रतावाढीची नोंद करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल यात दुरुस्ती करणे तसेच वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसूचित केलेली रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी आपल्या उमेदवारीचा अर्ज सादर करणे आदी बाबींची गरज असते.

 

 

त्यामुळे उद्योजकांनी वेळोवेळी गरज व मागणीनुसार डाऊनलोड केलेल्या उमेदवारांच्या याद्यांमध्ये समावेश होण्यासाठी आपल्या नोंदणीस आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. प्रत्येक उमेदवाराने आपल्या नोंदणीस आधार कार्ड जोडणी (लिंक) करणे आवश्यक आहे, अन्यथा उमेदवार या प्रकारच्या संधीपासून वंचित राहू शकतो. आधार नोंदणी केल्यानंतर किंवा याबाबत काही अडचणी असल्यास रोजगार केंद्राला 0721-2566066 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा ई-मेल पत्ता अथवा amravatirojgar@gmail.com किंवा asstdiremp.amravati@ese.maharashtra.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा, असे श्री. शेळके यांनी सांगितले.




0000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती