जिल्हा
परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या सोडतीमध्ये
66
जागांपैकी 33 जागा महिलांसाठी आरक्षित
अमरावती, दि.28 : अमरावती जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणूकीव्दारे गठित
होणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम राबविण्यात
आला असून यात 66 जागांपैकी 33 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या.
जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभाग (गट-66 साठी) ही आरक्षण सोडत नियोजन
भवन येथे काढण्यात आली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पवनीत कौर, उपविभागीय
अधिकारी नितीन व्यवहारे, निवडणूक शाखेचे प्रमोद देशमुख तसेच विविध गावांचे प्रतिनिधी
उपस्थित होते. सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडली. प्रारंभी गावांची
नावे नमूद असलेली प्रत्येक चिठ्ठी उपस्थितांना दर्शवून नंतर पारदर्शी डब्यात सर्वांसमोर
त्याची सरमिसळ करुन जय संदीप राहटे व रुचल मिलींद गंधाडे या बालकांच्या हस्ते चिठ्ठ्या
काढण्यात आल्या. त्यानंतर संबंधित गावाचे नाव
जाहीर करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या सदस्य पदासाठी चिखलदरा, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड,
तिवसा, अमरावती, अचलपूर, धारणी, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, भातकुली, चांदूररेल्वे,
धामगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर अशा 14 तालुक्यातील 66 जागांसाठी सोडत करण्यात आली.
66 जागांपैकी महिलांना 33 जागा प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती 12 पैकी
महिला 6, अनुसूचित जमाती 13 पैकी महिला 7, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) 7 पैकी महिला 4, सर्वसाधारण 34 पैकी महिला 16 अशा
जागांची सोडत निघाली. निवडणूक शाखेचे अधिकारी तसेच महसुल सहायक अनुपम उईके, प्रकाश
माहोरे, किशोर झोंबाडे आदींनी सोडत प्रक्रिया राबविण्यासाठी सहाय्य केले.
00000

.jpeg)

.jpeg)
No comments:
Post a Comment