जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध

 जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या

दहावी व बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध

अमरावती, दि. 15 (विमाका) : इयत्ता बारावीच्या जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in याा संकेतस्थळावर शनिवार दि. ९ जुलैपासुन तर इयत्ता दहावीची प्रवेशपत्रे ऑनलाईन पध्दतीने दि. १४ जुलैपासून संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. असे राज्य मंडळाकडुन कळविण्यात आले आहे.

प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्का मारुन स्वाक्षरी करावी.

जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक/प्राचार्य, सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये या बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी. प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिंटीग करताना महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून वेगळे शुल्क घेऊ नये. या प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा/प्राचार्यांचा शिक्का मारुन स्वाक्षरी करावी व ते ओळखपत्र विद्यार्थ्यांना देण्यात यावे. असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती