लोकसंख्यादिनानिमित्त इर्विनमध्ये कार्यक्रम

 लोकसंख्यादिनानिमित्त इर्विनमध्ये कार्यक्रम

अमरावतीदि.19: जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त दांपत्य संपर्क पंधरवडा व लोकसंख्या स्थिरता पंधरवडा राबविण्यात येत आहे. कुटुंब नियोजनाच्या उपायांचा अवलंब कराप्रगतीचा एक नविन अध्याय लिहा’ असे उपक्रमाचे घोषवाक्य आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे यांनी दिली. 

नुकताच इर्विन रूग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात  एक जनजागृतीपर कार्यक्रमही झाला. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेंद्र सोळंकेअधिसेविका ललिता अटाळकर, परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या शितल यावले, पाठ्यनिर्देशिका ममता चिंचोलेआहारतज्ज्ञ कविता देशमुख, परिसेविका संगीता पेंदाम, अधिपरिचारिका सिंधुताई खानंदे, प्रभाताई वानखडे, कविता ढोबळे, मनीषा गावंडे आदी उपस्थित होते.

लोकसंख्या स्थिरता पंधरवड्या’त  परिचर्या प्रशिक्षण महाविद्यायाच्या विद्यार्थिनींनी पोस्टर प्रदर्शन उपक्रमात सहभाग घेतली. सायली खडगीसाक्षी कापगडेकोमन बोदडे यांनी लोकसंख्यादिनावर आधारित पोस्टर्स तयार केली. भाग्यश्री घोटेकर, निकिता कांबळे, पूनम घायवट यांनी संदेश देणारी रांगोळी काढली. ललिता बंगालीप्रतिक्षा मालाधारी यांनी आरोग्य माहिती सादर केली. कुटुंब नियोजन साधनांच्या साहित्याचे प्रदर्शनही भरविण्यात आले. श्रेया चौधरीइशा गवईवैष्णवी घेलगेऐश्वर्या कोकणेदेवयानी माहुरेपुनम सानपसंगिता चंडेलेयोगमाया नंदागवळी यांनी जनजागृतीपर माहिती दिली.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती