शिक्षा बंदीच्या मृत्यूविषयी माहिती देण्याचे आवाहन

 शिक्षा बंदीच्या मृत्यूविषयी माहिती देण्याचे आवाहन

(शिक्षाबंदी अब्दुल हसन बंदे हसन मिस्‍त्री)

 

अमरावती, दि. 22: अमरावती मध्यवर्ती कारागृहातील शिक्षा बंदीच्या मृत्यूच्या घटनेविषयी माहितगार व्यक्तींनी माहिती देण्याचे आवाहन अमरावतीचे उपविभागीय दंडाधिकारी तथा चौकशी अधिकारी यांनी केले आहे.

शिक्षाबंदी क्र. सी. 2475, अब्दुल हसन बंदे हसन मिस्त्री (वय 46), रा. आर/ओ 301 पॅसोरेज अपार्टमेंट, के.जी. गार्डन जवळ, नवपाडा, मानिकपूर, वसई, (प) जि. पालघर. यांचा दि. 23 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी  2 वाजता नागपूरला सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल येथे मृत्यु झालेला आहे.

        या चौकशीत कैदी मयत होण्याचे कारण काय, कैदीचे मृत्यूपूर्व स्वास्थ्य कसे होते, कैदीला मारामारी होऊन मृत्यू झाले किंवा कसे, पोलिसांनी कोणती भूमिका बजावली, वैद्यकीय उपचाराचे कागदपत्रे व व्हिसेरा अहवाल आदी बाबी तपासण्यात येणार आहेत. ज्यांना या घटनेसंबंधी माहिती द्यावयाची आहे, त्यांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती व आवश्यक कागदपत्रांसह अमरावती उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात 2 ऑगस्टपर्यंत कार्यालयीन वेळेत समक्ष माहिती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती