‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वयंसेवी संस्थांनी योगदान द्यावे - निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल

 






स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

 हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वयंसेवी संस्थांनी योगदान द्यावे

-          निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल

अमरावतीदि. 15 : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दि. 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत घरोघरकार्यालयेआस्थापनांवर राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी  हर घर तिरंगा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, व्यापारी संस्था, महिला संघटना, युवक संघटनांनी योगदान द्यावे,  असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी आज येथे केले.

विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक बचतभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, अधिक्षक उमेश खोडके, जिल्हा आपत्ती व व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्यासह संस्थांचे मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. बिजवल म्हणाले की, नियोजित कालावधीत ग्रामीण आणि शहरी भागात प्रत्येक घरावर, कार्यालयांवरकारखान्यांवर, दुकानांवर राष्ट्रध्वज फडकावा यासाठी संस्थांनी आपला कृतीशील सहभाग नोंदवावा. या उपक्रमासाठी सहभाग नोंदवतानाच इतरांनाही प्रोत्साहित करावेत. ग्रामीण भागात नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध होण्यासाठी आर्थिक सहभाग द्यावा. कमी दरात राष्ट्रध्वज उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होत आहे. जिल्ह्यात जवळपास सात लाख घरे, कार्यालये, आस्थापना आहेत. जास्तीत जास्त ठिकाणी ध्वज फडकण्यासाठी संस्थांनी, व्यापारी बांधवांनी, आस्थापना-उद्योगांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कोविडकाळात संस्था, नागरिकांची मोठी मदत झाली. लसीकरण, तसेच विशेषकरून बुस्टर डोसचे लसीकरण वाढण्यासाठी जनजागृतीसाठी सहकार्य करावे. पुढील 75 दिवस 18 वर्षांवरील सर्वांना बुस्टर डोस विनामूल्य देण्यात येत आहेत. जिल्ह्यात त्याची सुरुवात झाली आहे. दुस-या मात्रेचे लसीकरण झालेल्यांनी बुस्टर डोस घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

 यावेळी सुरेश जैन, नजमा काझी, श्रीकांत देशमुख, सुनील भालेराव, डॉ. कमलकिशोर नावंदर, योगेश गुडधे, डॉ. संतोष राठी, आत्माराम पुरसवाणी, रजनीकांत बिरणवारे, बरखा बोंडे, संजय मुचंळले, हरिना फौंडेशनचे नरेशभाई, सीमेश श्रॉफ, कांतिलाल सोनी, आपत्कालीन सहायता समितीचे पुरुषोत्तमभाई, संकेत पाटील, राजेश व्यास, डॉ. शशांक दुबे, वर्षा तेलमोरे, प्रतिभा जयसिंगपुरे, संदीप रोंधे, नंदकिशोर राठी, नितीन सारडा, लीलाधर गावंडे, ज्योत्स्ना शेटे, आशिष पाटील, वसा संस्थेचे शुभम व भूषण साळुंके, प्रवीण वानखडे, संजय आचलिया, अनिल सुराणा, मिलिंद पाटील, कांताताई काळे, यशराज इंगळे, धनानंद नागदिवे, सचिन डाके, जया बद्रे, इरफान खान, प्रवीण गुल्हाने, सचिन जोशी, जयश्री ठाकरे, अनुप्रियाताई, प्रमिलाताई, रचना राठी, अशोक राठी, आनंद दातेराव, सूरज भोयर, प्रकाश बोके, मनीष पावडे, श्रीकिसन व्यास, अक्षय जंगलूर, रुपम सूर्यवंशी, मनीष खंडेलवाल, कमलकिशोर मालाणी, सुरेश मोहोड, भूषण झाडे, रुपेश हिंगणे,  सी. टी. नेवारे, तारा वानखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती