मेळघाटात खेडोपाडी आवश्यक कामांसाठी गावनिहाय समिती - जि. प. सीईओ अविश्यांत पंडा


 

मेळघाटात खेडोपाडी आवश्यक कामांसाठी गावनिहाय समिती

-         जि. प. सीईओ अविश्यांत पंडा

 

अमरावतीदि.15 :  दूषित पाणी बाधा प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मेळघाटातील गावांमध्ये आवश्यक विविध कामांच्या सातत्यपूर्ण संनियंत्रणासाठी समिती गठित करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज जारी केला.

चिखलदरा तालुक्यात दूषित पाणी पिल्याने नागरिकांना लागण होण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायत स्तरावरील विविध कामे वेळेत व अचूकपणे पार पडण्यासाठी समितीने दक्ष राहून कार्यवाही करावी, असे निर्देश श्री. पंडा यांनी धारणी व चिखलदरा येथील गटविकास अधिका-यांना दिले आहेत.

ग्रामसेवकशिक्षकआरोग्य सेवकअंगणवाडी सेविकाआशाजलसुरक्षकरोजगार सेवकपाणी पुरवठा कर्मचारी यांचा समितीत समावेश असेल. समिती महिन्यात दर सोमवारी गावातील आवश्यक कामे, स्थितीखर्च, आवश्यक निधी याचा सविस्तर आढावा घेईल. आठवड्याचे अहवाल दर बुधवारी विस्तार अधिकारी (पंचायतयांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिका-यांना प्राप्त होतील. समितीमधील सदस्यांना शंभर

 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.

महिन्यातील पहिल्या सोमवारी समिती  आरोग्यसाथरोग सनियंत्रणपाणी पुरवठाकुपोषण आढावाशिक्षण आढावामहाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आढावापेसाबाबत आढावाजलसंवर्धन आदींचा, दुस-या सोमवारी  बांधकाम आढावाकरवसुली आढावा, 15 वा वित्त आयोग खर्चाबाबत आढावाकृषी आढावापशुसंवर्धन आढावापथ दिवेविद्युत देयके भरणाबाबत आढावा,  तिस-या सोमवारी आरोग्यसाथरोग सनियंत्रणपाणी पुरवठाकुपोषण आढावाशिक्षण आढावामहाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आढावापेसाबाबत आढावाजलसंवर्धन आदींचा आढावा घेईल.

महिन्यातील चौथ्या सोमवारी  बांधकाम आढावाकरवसुली आढावा, 15 वा वित्त आयोग खर्चाबाबत आढावाकृषीबाबत आढावापशुसंवर्धनबाबत आढावापथ दिवेविद्युत देयके भरणाबाबत आढावा घेतला जाईल.

 000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती