सखी
निवारा केंद्रातुन संकटग्रस्त महिलांना मदतीचा हात
- जिल्हाधिकारी पवनीत कौर
अमरावती दि 21 (विमाका) :- संकटग्रस्त महिलांना आरोग्य, सुरक्षा, भोजन, निवारा, कायदेशिर बाबींची
मदत तसेच समुदपदेशन आदी सर्व सुविधा तात्काळ व एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्या, यासाठी
सखी निवारा केंद्राची (one stop crises centre) निर्मिती करण्यात आली आहे. या निवारा केंद्राच्या माध्यमातुन संकटग्रस्त
महिलांना मदतीचा हात द्यावा. या योजनेची व्यापक प्रचार प्रसिध्दी करण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सखी सेंटरच्या
व्यवस्थापकीय समितीच्या बैठकित त्या बोलत होत्या.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा महिला व बालविकास
अधिकारी तुकाराम टेकाडे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोळंके, सहा. जिल्हा आरोग्य
अधिकारी मनिषा सुर्यवंशी, सहा. पोलीस आयुक्त प्रशांत राणे, आदी यावेळी उपस्थित होते.
डफरिन रुग्णालयाच्या परिसरात सखी निवारा केंद्राची निर्मिती करण्यात
आली असुन या केंद्राअंतर्गत महिला व मुलींना तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात
येत आहे. प्रज्ञा महिला बहुउद्देशिय संस्थेच्या माध्यमातुन या सेवा केंद्रात विविध
सेवा पुरविण्यात येत आहे. संकटग्रस्त महिलांना या केंद्राची माहिती व्हावी यासाठी शासन
स्तरावर जनजागृती करण्यात येणार असल्याचे संबंधितांनी सांगितले. या केंद्रात महिला
कर्मचारी, केंद्र व्यवस्थापक, कायदेशिर सल्लागार, पोलीस अधिकारी असणार आहेत. महिलांसाठी
हे केंद्र चोवीस तास खुले रहाणार असुन संकटग्रस्त महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा
असे आवाहन श्रीमती कौर यांनी केले.
00000
.jpeg)

No comments:
Post a Comment