Posts

Showing posts from September, 2023

आकांक्षित ब्लॉक कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संकल्प सप्ताहाचा शुभारंभ धारणी येथील आदिवासी क्षेत्रातील नागरिकांची कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती

Image
  आकांक्षित ब्लॉक कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संकल्प सप्ताहाचा शुभारंभ धारणी येथील आदिवासी क्षेत्रातील नागरिकांची कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती       अमरावती, दि. 30 (जिमाका): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संकल्प सप्ताहाचा शुभारंभ भारत मंडपम, नवी दिल्ली येथे आज करण्यात आला. या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील आदिवासी बांधव तसेच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दूरदृष्य प्रणालीव्दारे ऑनलाईन उपस्थित होते.  जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा हे या कार्यक्रमाला प्रत्यक्ष नवी दिल्ली येथे उपस्थित होते. तर अमरावती येथून निती आयोगाचे आर. श्रवण, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी रिचर्ड यान्थन, परिविक्षाधीन अधिकारी नरेश आकनुरी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के, जिल्हा सूचना वि

अभय योजनेला 31 ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ; पाणीपट्टी थकबाकीदार ग्राहकांनी लाभ घ्यावा

  अभय योजनेला 31 ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ; पाणीपट्टी थकबाकीदार ग्राहकांनी लाभ घ्यावा               अमरावती, दि. 28 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपट्टीची थकबाकी भरण्यासाठी अभय योजना जाहिर करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत भाग घेणाऱ्या ग्राहकांनी मुद्यलाची पुर्ण रक्कम भरल्यास थकबाकीवरील विलंब आकारामध्ये 100 टक्के पर्यंत व्याज माफीची सवलत देण्यात येते. या योजनेला आता दि. 31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलव्यवस्थापन विभाग, अमरावती कार्यकारी अभियंता नितीन उपरेलू यांनी केले आहे.             महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्राहकांसाठी पाणी पट्टीच्या मुळ मुद्यलावरील विलंब आकार माफीच्या सवलतीची अभय योजना 1 फेब्रुवारी 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत जाहिर झाली होती. आता या योजनेस माहे एप्रिल 2023 ते ऑक्टोंबर 2023 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास शासनमार्फत मान्यता मिळाली आहे. म.जी. प्रा. चे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी दि. 26 सप्टेंबर 2023 रोजी  याबाबत परिपत्रक काढले असून वसुलीचे उद्यिष्टे पूर्ण करण्य

खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी मोहिम

  खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी मोहिम           अमरावती, दि. 28 : सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, मावा, नमकीन या अन्न पदार्थांना मोठी मागणी असते. त्यामुळे या काळात भेसळ, कमी दर्जाच्या उत्पादनांची बाजारात विक्री होण्याची शक्यता लक्षण अन्न व औषध प्रशासनामार्फत खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी तपासणीची मोहिम सुरु असल्याची माहिती सह आयुक्त गणेश परळीकर यांनी दिली आहे अमरावती शहर व जिल्ह्यातील मिठाई, खवा-मावा, खाद्यतेल, वनस्पती, घी व सणासुदीचे अन्नपदार्थ उत्पादक, रिपॅकर व घाऊक विक्रेते यांचे तपासणीची विशेष मोहिम खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी राबवली जात आहे. ग्राहकांना सुरक्षित व सकस अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी संशयित पदार्थांचे नमुने घेतले जात आहेत. ऑगस्ट 2022 पासून मोहिमे अंतर्गत अमरावती जिल्ह्यात मिठाई व नमकीनचे 5, खाद्यतेल व वनस्पतीचे 4, दुध व दुग्धजन्य पदार्थांचे 19 व आटा, रवा, बेसन, मैदा इत्यादी या अन्न पदार्थांचे 13 असे एकूण 41 नमुने विश्र्लेषणासाठी घेतले असून ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर दोषींव

महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना टॅब वितरणाचा कार्यक्रम स्थगित

  महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना टॅब वितरणाचा कार्यक्रम स्थगित अमरावती, दि. 28 : महाज्योतीमार्फत इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता 11 वी सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जेईई, नीट व एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षणाकरीता टॅब देण्याची योजना राबविण्यात येते.  या योजनेंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना टॅब मंजुर झाला आहे त्यांना शुक्रवार दि. 29 सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अमरावती येथे वितरण करण्यात येणार होते. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे टॅब वितरणाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असुन टॅब वाटपाबाबतची तारीख महाज्योती मार्फत संदेशव्दारे पाठविण्यात येईल. तरी संबधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी केले आहे. 000000

6 ते 12 ऑक्टोंबर कालावधीत ‘माहिती अधिकार सप्ताह’; जनजागृतीपर उपक्रम राबवा; राज्य माहिती आयोगाचे आवाहन

  6 ते 12 ऑक्टोंबर कालावधीत ‘माहिती अधिकार सप्ताह’; जनजागृतीपर उपक्रम राबवा; राज्य माहिती आयोगाचे आवाहन             अमरावती, दि. 28: माहितीचा अधिकारी अधिनियमाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दि. 6 ते 12 ऑक्टोंबर कालावधीत माहिती अधिकार सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये माहिती अधिकारी कायद्याबाबत सर्व शासकीय कार्यालयाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून  जनजागृती मोहिम राबवावी, असे आवाहन राज्य माहिती आयोगाचे उपसचिव देविसिंग डाबेराव यांनी केले आहे.             सप्ताहामध्ये माहिती अधिकारी कायद्याबाबत जनमानसात व्यापक जाणीव जागृती व्हावी यासाठी प्रशासनाव्दारे विविध उपक्रम राबविण्यात यावे. यामध्ये शासकीय, निमशासकीय तसेच शाळा महाविद्यालय, विद्यापीठ व शैक्षणिक संस्थामध्ये माहिती अधिकार या विषयावर आधारित पथनाट्य, प्रश्नमंजुषा, निबंधस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्रे व व्याख्यानाचे आयोजन करण्यात यावे. माहितीचा अधिकारी अधिनियम, 2005 चे कलम 4अंतर्गत प्रत्येक कार्यालयाने जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांची नावे व पदनाम दर्शविणारे फलक लावणे, 17 मुद्यांची माहित

पंतप्रधान साधणार जिल्हा प्रशासनाशी संवाद; पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

  पंतप्रधान साधणार जिल्हा प्रशासनाशी संवाद; पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा              अमरावती, दि. 28: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत शनिवार दि. 30 सप्टेंबर रोजी धारणी तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांशी दुरदृष्य प्रणालीव्दारे संवाद साधणार आहे. हा संवाद कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे.  त्याअनुषंगाने आज कार्यक्रमाची पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज आढावा बैठक  घेतली. यावेळी कार्यक्रमाची व्यवस्था सुयोग्य पार पाडण्यासाठी संबधित विभाग प्रमुखांकडे जबाबदारी सोपविण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी दिले.             केंद्र सरकारकडून सामाजिक आणि आर्थिक मागास तालुक्यांच्या शाश्वत विकासासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणीचा त्यामध्ये समावेश करण्यात आला असून येथील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाची प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. पंतप्रधानांसोबत दुरदृष्य

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी); मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती

  विशेष लेख : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी); मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), अमरावती मार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. सारथीमार्फत देण्यात येणाऱ्या या योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करीत आहेत. या संदर्भात माहिती करुन देणारा लेख.             महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून 25 जून 2018 रोजी कंपनी अधिनियम 2013 चे कलम 8 अन्वये सारथी संस्थेचे स्थापना करण्यात आली तसेच नोंदणी कंपनी कायद्यान्वये नोंदणी करण्यात आली आहे. सारथी संस्थचे मुख्य कार्यालय पुणे येथे तर उपकेंद्र कोल्हापूर येथे आहे. तसेच खारघर(नवी मुंबई), पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर येथे विभागीय कार्यालय आहेत. सारथी संस्था मुख्यत: मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ही संस्था नियोजन विभागाच्या अधिपत्त्याखाली कामकाज करते. केंद्रीय लोकसेवा आयोग सारथीमार्फत

ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी

  ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी अमरावती, दि. 27 : अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी(दि.28) होणार आहे. या कालावधीत गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून ईद ए मिलाद या सणाची सुट्टी गुरुवार दि. 28 ऐवजी शुक्रवार दि. 29 रोजी शासकीय सुट्टी जाहीर झाल्याचे आदेश सामान्य प्रशासनाकडून निर्गमित झाले आहे.             अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन शुक्रवार दि. 29 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असून दि. 28 सप्टेंबर रोजी सर्व शासकीय कार्यालय नियमित सुरु राहतील. 00000

महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण

  महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण अमरावती, दि. 27 : महाज्योतीमार्फत इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जेईई, नीट व एमएचटी-सीईटी च्या प्रशिक्षणासाठी टॅबचे वितरण करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना टॅब मंजुर झाला आहे त्यांनी कागदपत्रासह शुक्रवार दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अमरावती येथे उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी केले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता 11 वी सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जेईई, नीट व एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षणाकरीता टॅबलेट देण्याची योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत सन 2023-24 या शैक्षणिक सत्र करीता अमरावती जिल्ह्यातील इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 11 वी सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्या 394 विद्यार्थ्यांना टॅबलेट मंजूर झा

ईद-ए-मिलाद उत्सवात शहरातील वाहतूक मार्गात बदल

  ईद-ए-मिलाद उत्सवात शहरातील वाहतूक मार्गात बदल             अमरावती, दि. 27 : अमरावती शहरात  28 सप्टेंबर रोजी (एक दिवस मागे-पुढे चंद्र दर्शनानुसार) मुस्लीम बांधवाचे ईद-ए-मिलाद  निमित्त मिरवणुक काढण्यात येतात. या कालावधीत मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. ते याप्रमाणे : वाहतुकीचा पर्यायी मार्ग             ट्रांसपोर्ट नगर ते नागपुरी गेट चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची एकतर्फा वाहतुक सुरू राहील. चित्रा चौक ते पठाण चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक प्रभात टॉकीज व दिपक चौक मार्गे वळविण्यात येईल. हनुमान नगर पोलीस चौकी ते पठाण चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकाराचा जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक महाजनपुरा मार्गे वळविण्यात येईल.   जवाहर गेट ते टांगा पडाव या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक सराफा- गांधी चौक- जयस्

गणेशोत्सवात शहरातील वाहतूक मार्गात बदल

  गणेशोत्सवात शहरातील वाहतूक मार्गात बदल             अमरावती, दि. 27 : अमरावती शहरातील न्यु आझाद गणेश मंडळाचे गणपती विसर्जन मिरवणुक दि.  5 ऑक्टोबर  रोजी खापर्डे बगीचा येथून शहरातील विविध भागातून जाणार आहे. या कालावधीत मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. ते याप्रमाणे : वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग न्यु गणेश मंडळाची गणपती विसर्जन मिरवणुक खापर्डे बगीचा येथून सुरू होवून मिरवणुक इर्विन चौकात आल्यानंतर गर्ल्स हायस्कुल चौकाकडून इर्विन चौका कडे येणारी वाहतुक पोलीस पेट्रोल पंप मार्गे बस स्टँड कडून व बाबा कॉर्नर कडून इर्विन चौकाकडे येणारी वाहतुक लेखुमल चौकाकडे वळविण्यात येईल. विसर्जन मिरवणुक मर्च्यूरी टी पॉइंट ते रेल्वे स्टेशन मार्गाने असतांना रेल्वे स्टेशन चौकाकडून येणारे व मर्च्यूरी टी पॉइंट कडून रेल्वे स्टेशन कडे जाणारी वाहतुक एकतर्फी मार्गाने सुरू राहील. मिरवणुक रेल्वे स्टेशन चौक ते रेल्वे ब्रिजवर आल्यानंतर एस टी स्टँड कडून येणारी वाहतुक उस्मानिया मस्जिद ते खापर्डे बगीचा मार्गाने वळविण्यात येत आहे. तसेच रूख्मीणी नगर कडून हमालपुरा रोडने रेल्वे ब्रिजवर

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास दि.30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

  महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास दि.30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ            अमरावती दि. 27 :  सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे  विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास शनिवार दि. 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे समाजकल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे.  सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गांसाठी  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,  शिक्षण फी  परीक्षा फी योजना, राजर्षि छत्रपती शाहू महाराज  गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रम संलग्न्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजना या योजना राबविण्यात येतात.            माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत सन 2022-23 वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर नुतनीकरणाचे अर्ज व नवीन अर्ज भरण्यासाठी  तसेच सन 2021-22 साठी रि-अप्लाय करण्यासाठी  दि. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  ऑनलाईन नुतनीकरणाचे  अर्ज  विहित

जिल्हा लोकशाही दिन 3 ऑक्टोंबरला

  जिल्हा लोकशाही दिन 3 ऑक्टोंबरला             अमरावती, दि. 27 : जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन, मंगळवार, दिनांक 3 ऑक्‍टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.   00000

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना व्यावसायिकांच्या प्रगतीला महामंडळाचे सहाय्य

    अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना व्यावसायिकांच्या प्रगतीला महामंडळाचे सहाय्य मराठा समाजातील व्यावसायिकांच्या प्रगतीसाठी अणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सहाय्य केले जाते. आजवर महामंडळाच्या सहाय्यातून अनेक व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करुन इतरांच्याही हाताला काम उपलब्ध करुन देत आहे.   महामंडळामार्फत विविध व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. यात नियमित परतफेड करणाऱ्यांना व्याजाचा परतावा दिला जातो. महामंडळाच्या योजनांची संपूर्ण यंत्रणा व कार्यपध्दती ऑनलाईन असून पूर्णपणे पारदर्शक आहे. ही योजना लाभार्थीभिमुख असून लाभार्थी जोपर्यंत आवश्यक सर्व माहिती   www.udyog.mahaswayam.gov.in   या वेब प्रणालीवर अपलोड करीत नाही, तोपर्यंत पुढील कार्यवाही करता येत नाही. महामंडळाच्या योजनासाठी सामाईक अटी व शर्ती महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. ही योजना प्रामुख्याने मराठा प्रवर्गासाठी तथा ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्त्वात नाही, अशांसाठी आहे. योजनेसाठी वयोमर्यादेची अट पुरुषांसाठी आण

सेवा महिना अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार

  सेवा महिना अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार   अमरावती, दि. 27 (जिमाका):  सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत पूर्ण व्हावी आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा, यासाठी राज्यात 17 सप्टेंबरपासून ‘सेवा महिना’ राबविण्याला सुरुवात झाली असून तो 16 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. ‘ सेवा महिना’ अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना केल्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना माहिती प्राप्त करून देणे, नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, यासाठी महिनाभर सेवा महिना हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या सेवा महिना कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डी. बी. टी. पोर्टल, नागरी सेवा केंद्र,सार्वजनिक तक्रार पोर्टल (पब्लिक ग्रिव्हियन्स पोर्टल), विभागाच्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व प्र

निवडणूक विभाग;जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे शिबीराचे आयोजन

                                         निवडणूक विभाग;जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे शिबीराचे आयोजन                  अमरावती, दि. 26:  शासनाव्दारे दि. 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत सेवा महिना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने निवडणूक विभागाव्दारे आज(दि.27) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे विशेष शिबिरोच आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये मतदार नोंदणी, आधारकार्ड, पॅन कार्ड दुरुस्ती अशा विविध सेवांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. तरी नवमतदार व पात्र लाभार्थ्यांनी शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे. 00000

10 ऑक्टोंबरपर्यंत कलम 144 लागू

  10 ऑक्टोंबरपर्यंत कलम 144 लागू                  अमरावती, दि. 26:  जिल्हा जातीय व राजकीयदृष्टया संवेदनशील आहे. आगामी काळात 28 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन तसेच ईद ए मिलाद मुस्लीम धर्मियांचा उत्सव आहे. या कालावधीत मिरवणुका, विविध धार्मीक व साजाजिक कार्यक्रम, आंदोलने दरम्यान सामाजिक माध्यमाव्दारे आक्षेपार्ह संदेश प्रसारीत झाल्याने काही ठिकाणी वेगवेगळया कारणावरुन जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच जातीय सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था बाधीत होऊ नये व जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी, यासाठी 10 ऑक्टोंबर 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 चे प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी लागू केले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तींविरुध्द कारवाई करण्यात येईल. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.   0000

अटल अर्थसहाय्य योजना; अशासकीय सदस्यांच्या नेमणूकीसाठी अर्ज मागविले

  अटल अर्थसहाय्य योजना; अशासकीय सदस्यांच्या नेमणूकीसाठी अर्ज मागविले               अमरावती, दि. 26: सहकार व वस्त्रोद्योग विभागाव्दारे सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना राबविण्यात येते. या योजनेची अमंलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीसाठी नवीन अशासकीय सदस्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुक पात्र व्यक्तीनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एस. एस. कुंभार यांनी केले आहे.               राज्यस्तरीय समितीच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय समितीसाठी नवीन अशासकीय सदस्याची नियुक्ती करायची आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय व अर्धशासकीय आस्थापनावर, संस्थावर कामकाजाचा अनुभव असणाऱ्या सेवानिवृत्त व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी सहकारी कार्यालयाकडे अटल अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अशासकीय सदस्यपदी नियुक्तीसाठी अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सहकार संकुल पहिला माळा, कांतानगर, अमरावती येथे संपर्क साधावा. 0000

अंमली पदार्थांच्या वापराला प्रतिबंधासाठी सर्व विभागांने पुढाकार घ्यावा;समितीच्या बैठकीत चर्चा

  अंमली पदार्थांच्या वापराला प्रतिबंधासाठी सर्व विभागांने पुढाकार घ्यावा;समितीच्या बैठकीत चर्चा                  अमरावती, दि. 26 : अंमली पदार्थ वापराच्या प्रतिबंधाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक आहे. अंमली पदार्थांची विक्री जास्त होणाऱ्या परिसरात संबधित विभागाने वेळोवेळी तपासणी करावी. व्यसनमुक्ती केंद्राशी समन्वय ठेवून या सामाजिक प्रश्नाला आळा घालण्यासाठी  सर्व विभागांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांनी केले.               अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून जिल्हास्तरीय अंमली  पदार्थ विरोधी कार्यकारी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांची पोलिस आयुक्तालयात आज बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसिलदार प्रशांत पडघन, टपाल विभागाचे सहायक अधिक्षक अतुल काळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अरविंद गभणे, कृषी उपसंचालक विभागाचे उज्ज्वल आगरकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.स्वाती सोनोने, अन्न व औषध प्रशासनाचे वैभव सुपसांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.                अंमली

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

                                                      शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू    अमरावती, दि. 26 :  शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.                सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात  लागू  करण्यात आला असून तो 8 ऑक्टोंबर  2023 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  नविनचंद्र रेड्डी  यांनी कळविले आहे. 000000

मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणासाठी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध; 29 सप्टेंबरपर्यत हरकती, आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

                           मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणासाठी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध; 29 सप्टेंबरपर्यत हरकती, आक्षेप नोंदविण्याचे आवाहन   अमरावती, दि. 26 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदारयादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमांतर्गत पूनरिक्षण पूर्व उपक्रमाचा एक भाग म्हणून दि. 29 सप्टेंबरपर्यंत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्यात येत आहे. यासाठी मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणासाठी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत दि. 29 सप्टेंबर 2023 पर्यत हरकती, आक्षेप नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघा अंतर्गत येणाऱ्या एकूण 2657 यादी भागांमध्ये राबविण्यात येत आहे.  कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुर्व पुनरिक्षण उपक्रमाचा एक भाग म्हणुन दि. 29 मे 2023 रोजीच्या भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार दि. 21 जुल

मेरी माटी मेरा देश; अमृत कलश यात्रा व स्वच्छता पंधरवाडा निमित्य भातकुली नगर पंचायत येथे प्रभात फेरी: मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी

                         मेरी माटी मेरा देश; अमृत कलश यात्रा व स्वच्छता पंधरवाडा निमित्य भातकुली नगर पंचायत येथे प्रभात फेरी: मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी                  अमरावती, दि. 26 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अनुषंगाने, मेरी माटी मेरा देश  अभियान अंतर्गत भातकुली येथील नगर पंचायत येथे अमृत कलश यात्रा व स्वच्छता पंधरवाडा निमित्त आज जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केली. यावेळी नगरपंचायातीचे नगराध्यक्षा योगिता राजु कोलेटके तसेच नगरपंचायत सभापती, उपसभापती, नगरसेवक आदी उपस्थित होते.   कलश यात्रा व प्रभात फेरीची सुरुवात शहरातील आठवडी बाजार येथून नगरपंचायत वाचनालय मार्गे जात असताना शहरात ठिकठिकाणी अमृत कलश यात्रेचे पूजन करून वाजत गाजत स्वागत करण्यात आले. अमृत कलश यात्रेचा समारोप महर्षी वाल्मिकी चौक येथे करण्यात आला. कलश यात्रेमध्ये मुख्याधिकारी रविन्द्र पाटील, कार्यालय अधिक्षक मयुर बेहरे, कर निरिक्षक दिपक खोब्रागडे, शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, नगरपंचायतीचे कर्मचारी, सफाई क