महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना टॅब वितरणाचा कार्यक्रम स्थगित
अमरावती, दि. 28 : महाज्योतीमार्फत इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता 11 वी सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जेईई, नीट व एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षणाकरीता टॅब देण्याची योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना टॅब मंजुर झाला आहे त्यांना शुक्रवार दि. 29 सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अमरावती येथे वितरण करण्यात येणार होते. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे टॅब वितरणाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असुन टॅब वाटपाबाबतची तारीख महाज्योती मार्फत संदेशव्दारे पाठविण्यात येईल. तरी संबधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment