खनिकर्म विभाग; ई-निवीदेस 12 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 

खनिकर्म विभाग; ई-निवीदेस 12 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 

       अमरावती, दि. 6 : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अचलपूर, चांदूरबाजार व धामणगाव रेल्वे तालुक्यातील नदीपात्रातील गाळ व गाळ मिश्रीत वाळू, वाळूडेपोपर्यंत वाहतुक व डेपो निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठी ई-निवीदा मागविण्यात आली होती. या ई-निविदा सूचनेला मंगळवार दि. 12 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून याची नोंद संबंधितांनी  घ्यावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी केले आहे.

 

 

अमरावती जिल्ह्यात पुरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या अचलपूर, चांदूरबाजार व धामणगाव रेल्वे तालुक्यातील नदीपात्रातील स्थळांतुन गाळ व गाळ मिश्रीत वाळूची, वाळूडेपो पर्यंत वाहतुक करणे व डेपो निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठी ई-निवीदा सुचना प्रसिध्द करण्यात आली होती. निवीदा स्विकारण्याची अंतिम दि. 5 सप्टेंबरपर्यंत होती. त्यानुसार 4 क्षेत्रांपैकी फक्त मौजे दिघी महल्ले तालुका धामणगाव रेल्वे येथे निवीदा प्राप्त झाले असूनउर्वरित 3 क्षेत्रांसाठी एकही निवीदा प्राप्त झालेली नाही. तथापि मौजे दिघी महल्ले ता. धामणगाव रेल्वे या क्षेत्राव्यतिरिक्त इतर 3 ई-निवीदेस दि. 12 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रथम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती