Tuesday, September 12, 2023

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत अमरावती विभागातील ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण ग्रामस्तरावर नाविण्यपूर्ण संकल्पना राबवा- अविश्यांत पंडा

 









संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत अमरावती विभागातील ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण

ग्रामस्तरावर नाविण्यपूर्ण संकल्पना राबवा- अविश्यांत पंडा

 

          अमरावती, दि. 12 :  स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे संत गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार प्रत्येक ग्रामपंचायतीने आत्मसात करावे. केवळ पुरस्कारांसाठी ग्राम स्वच्छता न करता गावाच्या विकासासाठी स्वच्छतेची चळवळ निरंतरपणे सुरु ठेवा. यासाठी आपल्या ग्रामपंचायतीत नाविण्यपूर्ण संकल्पना राबवून इतर गावांसाठी आदर्श निर्माण करा, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज केले.

 

        येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत अमरावती विभागातील बक्षीस पात्र ग्रामपंचायतीना पुरस्कारांचे वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी श्री. पंडा यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींना धनादेश, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

 

              यावेळी अकोला जिल्हा परिषदचे अध्यक्ष संगिता अढाऊ, जि.प.सदस्य श्रीमती. कोल्हे,  उपायुक्त राजीव फडके, संतोष कवडे, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आदि उपस्थित होते.

 

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन 2018-19 : प्रथम : सावंगा ता.वरुड जि. अमरावती(पुरस्कार रक्कम 10 लक्ष रुपये), व्दितीय : अजिसपूर ता.जि.बुलडाणा(पुरस्कार रक्कम 8 लक्ष रुपये), तृतीय- पांगरखेड ता.मेहकर जि.बुलडाणा(पुरस्कार रक्कम 6 लक्ष रुपये)

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन 2019-20 : प्रथम : सावळी ता.जि. बुलढाणा(पुरस्कार रक्कम 10 लक्ष रुपये), व्दितीय : नागापूर ता. उमरखेड जि.यवतमाळ (पुरस्कार रक्कम 8 लक्ष रुपये), तृतीय- ढोरखेडा ता.मालेगाव जि.वाशिम(पुरस्कार रक्कम 6 लक्ष रुपये)

 

एकत्रित एक स्पर्धा सन 2020-21 व 2021-22 : प्रथम : खिरगव्हाण ता.अंजनगाव सुर्जी जि. अमरावती(पुरस्कार रक्कम 10 लक्ष रुपये), व्दितीय : कापशी रोड ता. जि.अकोला (पुरस्कार रक्कम 8 लक्ष रुपये), तृतीय- सिंदखेड ता.मोताळा जि.बुलढाणा(पुरस्कार रक्कम 6 लक्ष रुपये)

 

विशेष पुरस्कार पात्र ग्रामपंचायत 2019-20

 

1.स्व.वसंतराव नाईक पुरस्कार(सांडपाणी व्यवस्थापन)- असिसपूर ता.जि.बुलढाणा.

2.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार(पाणी गुणवंत्ता व पाणी व्यवस्थापन)-सावळी(दा.) ता. अचलपूर जि.अमरावती.

3.स्व.आबासाहेब खेडकर पुरस्कार(शौचालय व्यवस्थापन)- कुंभारी ता. घाटंजी जि.यवतमाळ (पुरस्कार रक्कम प्रत्येकी 30 हजार रुपये.)

 

विशेष पुरस्कार पात्र ग्रामपंचायत 2021-21 व 2021-22 :

 

1.स्व.वसंतराव नाईक पुरस्कार(सांडपाणी व्यवस्थापन)- उत्तमसरा ता.भातकुली जि. अमरावती

2.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार(पाणी गुणवंत्ता व पाणी व्यवस्थापन)- मधापुरी ता.मुर्तिजापूर जि.अकोला

3.स्व.आबासाहेब खेडकर पुरस्कार(शौचालय व्यवस्थापन)- अजिसपूर ता. जि.बुलडाणा (पुरस्कार रक्कम प्रत्येकी 30 हजार रुपये.)

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...