अभय योजनेला 31 ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ; पाणीपट्टी थकबाकीदार ग्राहकांनी लाभ घ्यावा

 अभय योजनेला 31 ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ;

पाणीपट्टी थकबाकीदार ग्राहकांनी लाभ घ्यावा

              अमरावती, दि. 28 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपट्टीची थकबाकी भरण्यासाठी अभय योजना जाहिर करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत भाग घेणाऱ्या ग्राहकांनी मुद्यलाची पुर्ण रक्कम भरल्यास थकबाकीवरील विलंब आकारामध्ये 100 टक्के पर्यंत व्याज माफीची सवलत देण्यात येते. या योजनेला आता दि. 31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलव्यवस्थापन विभाग, अमरावती कार्यकारी अभियंता नितीन उपरेलू यांनी केले आहे.

            महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्राहकांसाठी पाणी पट्टीच्या मुळ मुद्यलावरील विलंब आकार माफीच्या सवलतीची अभय योजना 1 फेब्रुवारी 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत जाहिर झाली होती. आता या योजनेस माहे एप्रिल 2023 ते ऑक्टोंबर 2023 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास शासनमार्फत मान्यता मिळाली आहे. म.जी. प्रा. चे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी दि. 26 सप्टेंबर 2023 रोजी  याबाबत परिपत्रक काढले असून वसुलीचे उद्यिष्टे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

            पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी दररोज होणारा खर्च व प्रत्यक्ष उत्पन्न यामध्ये फार मोठी तफावत असल्यामुळे मजीप्रामार्फत वसुली मोहिम राबविण्यात येत आहेत. अमरावती व बडनेरा शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी दरमहा 160 लक्ष रूपये इलेक्ट्रीक बिलाचा खर्च येत असुन देय तारखेत बिलाचा भरणा न केल्यास 3.10 लक्ष रूपयांचा दंड मजीप्राला अकारण भरावा लागतो. एकीकडे नियमितपणे पाणी पट्टीचा भरणा करणारे ग्राहक तर दुसरीकडे वर्षानुवर्ष टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांमुळे मजीप्राच्या उत्पन्नावर याचा विपरीत परिणाम होत आहे. पाणी पट्टी थकबाकी व विविध देणींच्या दायित्त्वाचे आर्थिक ओझे असल्यामुळे सद्य:स्थितीत पाणी बिलांच्या थकबाकीसाठी पाणी पुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे थकीत पाणी पट्टी ग्राहकांनी आपले कर्तव्य समजुन व्याज माफीच्या अभय योजनेचा लाभ घ्यावा व नियमित बिलाचा भरणा करावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती