जवाहर नवोदय विद्यालय; इयत्ता 9 वी व 11 वीत प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

 जवाहर नवोदय विद्यालय; इयत्ता 9 वी व 11 वीत प्रवेशासाठी

ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

 

           अमरावती, दि. 20: जवाहर नवोदय विद्यालय अमरावती येथे शैक्षणिक सत्र 2024-25 करिता इयत्ता 9 वी व 11 वीत प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेश घेण्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 31 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.

 

            प्रवेश अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय समिती किंवा जवाहर नवोदय विद्यालय अमरावतीच्या संकेतस्थळावर www.navodaya.gov.in किंवा https://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/AMRAVATI/en/home/ येथे निशुल्क्‍ अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर असून प्रवेश परीक्षा दि. 10 फेब्रुवारी 2024 रोजी  आयोजित करण्याचे निर्धारित केले आहे. प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी अमरावती जिल्ह्यातील रहीवासी व अमरावती जिल्ह्यातीलच मान्यता प्राप्त शाळेतुन सत्र 2023-24 वर्ग 9 वी करिता वर्ग 8 वीमध्ये तर 11 वी करीता 10 वीमध्ये अध्यनरत असावा. विद्यार्थ्यांचा जन्म वर्ग 9 वी करीता 1 मे 2009 ते 31 जुलै 2011 व वर्ग 11 वी करीता 1 जुन 2007 ते 31 जुलै 2009 दरम्यान असावा. जन्म तिथी आरक्षित आणि अनारक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्याकरीता सारखीच आहे. अधिक माहिती करीता विद्यार्थ्यांने संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा जवाहर नवोदय विद्यालय अमरावती येथे संपर्क साधावा.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती