जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी इको फ्रेन्डली गणरायाची स्थापना
अमरावती
,
दि. १९: गणेशोत्सवानिमित्त आज जिल्हाधिकारी सौरभ कटियार
यांच्या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाच्या
इको फ्रेंन्डली मूर्तीची विधिवत पूजा करुन
प्रतिष्ठापना करण्यात आली.
गणपती ही बुद्धीची देवता आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आनंदी, व भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करा. या निमित्ताने
सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी, समाधानाचे चांगले दिवस येऊ दे, यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळ देण्याचे साकडे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी
गणरायाला घातले.
हा उत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी
होणार नाही, निर्माल्य ठरलेल्या ठिकाणीच
एकत्रित केले जाईल, याची काळजी
गणेश मंडळ व भाविकांनी घ्यावी, असे आवाहनही
यानिमित्ताने जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी केले आहे.
00000


.jpeg)
No comments:
Post a Comment