उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 18 : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी, मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या महाविद्यालयांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कार’ देण्यात येणार असून यामध्ये महाविद्यालयांना भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार पुरस्कारासाठी इच्छुक महाविद्यालयानी दि. 15 डिसेंबरपर्यंत गुगल अर्ज करण्याचे आवाहन उपसचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी म.रा. पारकर यांनी केले आहे.

 

            भारत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 घोषित केला असून मतदाराची नोंदणी करण्यात येणार आहे. तरूण मतदाराला देशाच्या, राज्याच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी करण्याचा मार्ग म्हणजे त्यांची मतदार यादीत नोंद करणे होय. तरूण पिढिच्या सहभागासाठी मुख्य निवडणूक कार्यालयाने ‘उत्कृष्ठ मतदार-मित्र महाविद्यालय पुरस्काराचे’ आयोजन केले आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी यांच्या सहकार्याने अठरा वर्षावरील सर्व तरूण पिढिला निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतला जाईल. सन 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी, दि. 1 जानेवारी 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत मतदार यादीत आगाऊ नोंदणी करण्याची संधी आहे असून 2024 मधील निवडणुकांसाठी महत्तवपूर्ण असणार आहे.

 

            पुरस्कारासाठी नामांकनासाठी महाविद्यालयांनी गूगल फॉर्मवर भरावयाची माहिती याप्रमाणे :

1.         महाविद्यालयातील एकुण विद्यार्थ्यांची संख्या.

2.         दि. 1 जानेवारी 2014 रोजी महाविद्यालयातील 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या.

3.         महाविद्यालयातील मतदार नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या.

4.        महाविद्यालयातील मतदार नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी.

5.         मतदार जागृतीसाठी महाविद्यालयाने राबवलेले उपक्रम.

6.         महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांतर्गत मतदार जागृतीसाठी राबवलेले उपक्रम.

 

 कनिष्ठ महाविद्यालयांनी जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयाचे सहकार्य घेऊन मतदार नोंदणीची शिबिरे राबवावित किंवा वोटर हेल्पलाईन या मोबाईल ॲपवरून किंवा वोटर सर्व्हिस पार्टल वरून विद्यार्थ्यांची ऑनलाईन मतदार नोंदणी करून घ्यावी. या पुरस्कारासाठी 15 डिसेंबर 2023 पर्यंत गूगल अर्ज भरून पाठवावा. या पुरस्काराचे वितरण 25 जानेवारी 2024 रोजी केले जाणार आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्राच्या सह महसूल विभागांतर्गत सह महाविद्यालयांची निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी democracybook2022@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधावा. तसेच गुगल अर्जासाठी  https://forms.gle/62YsA6SA3ngZn4UaA या लिंकवर असलेली पीडीएफ https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

            मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे : निवासाचा पुरावा, वयाचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, कुटुंबातील एखाद्याचा किंवा शेजारच्याचा मतदार ओळखपत्र क्रमांक.

00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती