Thursday, September 21, 2023

वाढोणा रामनाथ येथे महिला बचत गटाच्या उत्पादीत वस्तूंना मिळाली हक्काची बाजारपेठ








 वाढोणा रामनाथ येथे महिला बचत गटाच्या उत्पादीत वस्तूंना मिळाली हक्काची बाजारपेठ

 

 अमरावती, दि. 20: नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ येथे पोळा सणाचे औचित्य साधून आठवडी बाजारामध्ये महिला बचत गटाच्या उत्पादीत वस्तूंना स्टॉल उपलब्ध करुन दिले आहे. यामुळे महिला बचत गटाला हक्काची बाजारपेठ मिळाली असून उत्पादित वस्तूंच्या खरेदीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

 

            गट विकास अधिकारी प्रकाश नाटकर व उमेद यांच्या सहकार्याने महिला बचत गटाने उत्पादीत केलेल्या वस्तूना बाजार पेठ उपलब्ध करून दिली आहे. महिला बचत गटाच्या उत्पादित वस्तूना योग्य भाव मिळवा आणि व्यापाराचे कौशल्य वृद्धीगंत व्हावे. तसेच या माध्यमातून बचत गटांचे आर्थिक  उत्पन्नात वाढ होऊन सामाजिक दर्जा सुधारणास मदत व्हावी या उद्देशाने वाढोणा रामनाथ येथील आठवडी बाजारामध्ये स्टॉल लावण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याप्रमाणेच बचत गटाच्या उत्पादित वस्तूना प्रोत्साहन मिळावे यासाठी तालुक्यातील इतर ठिकाणच्या आठवडी बाजारामध्ये स्टॉल लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामपंचायतीना सूचना देण्यात आले आहे, असे गट विकास अधिकारी प्रकाश नाटकर यांनी सांगितले. यावेळी विस्तार पंचायत विठ्ठल जाधव,  सरपंच सविता तिरमारे, ग्राम विकास अधिकारी राजेंद्र वाकोडे, उमेदचे रश्मी कुंभलकर व ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी आदी उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...