Thursday, September 21, 2023

मत्स्यव्यवसाय साहित्य खरेदीसाठी निवीदा मागविल्या

 मत्स्यव्यवसाय साहित्य खरेदीसाठी निवीदा मागविल्या

अमरावती, दि. 20: सहायक आयुक्त मत्‍स्यव्यवसाय कार्यालयामार्फत मत्स्यव्यवसाय उपयोगी साहित्य खरेदीकरीता सीलबंद निवीदा मागविण्यात आले आहे. इच्छुक निविदाधारकांनी सीलबंद निविदा दि. 5 ऑक्टोंबरपर्यंत सादर करावे, असे आवाहन सहायक आयुक्त सु.रा. भारती यांनी केले आहे. 

 

            मानव विकास कार्यक्रम सन 2022-23 अंतर्गत तालुका स्पेसिफिक योजनेकरिता मत्स्यव्यवसाय उपयोगी साहित्य जसे तरंगते मत्स्यखाद्य, फेक जाळे, फास जाळे, लाकडी नौका इत्यादी साहित्याची खरेदी करावयाची आहे. याकरीता इच्छुक निविदाधारकांनी सीलबंद निविदा सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, कार्यालय आशिष ठाकरे यांची इमारत, केशव कॉलनी, विद्याभारती कॉलेज जवळ, कॅम्प रोड, अमरावती येथे सादर करावी. जाहिर लिलावसंदर्भातील माहिती सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0721-2662421 वर किंवा सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, अमरावती येथे संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...