6 ते 12 ऑक्टोंबर कालावधीत ‘माहिती अधिकार सप्ताह’; जनजागृतीपर उपक्रम राबवा; राज्य माहिती आयोगाचे आवाहन

 6 ते 12 ऑक्टोंबर कालावधीत ‘माहिती अधिकार सप्ताह’; जनजागृतीपर उपक्रम राबवा; राज्य माहिती आयोगाचे आवाहन

            अमरावती, दि. 28: माहितीचा अधिकारी अधिनियमाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दि. 6 ते 12 ऑक्टोंबर कालावधीत माहिती अधिकार सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये माहिती अधिकारी कायद्याबाबत सर्व शासकीय कार्यालयाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून  जनजागृती मोहिम राबवावी, असे आवाहन राज्य माहिती आयोगाचे उपसचिव देविसिंग डाबेराव यांनी केले आहे.

            सप्ताहामध्ये माहिती अधिकारी कायद्याबाबत जनमानसात व्यापक जाणीव जागृती व्हावी यासाठी प्रशासनाव्दारे विविध उपक्रम राबविण्यात यावे. यामध्ये शासकीय, निमशासकीय तसेच शाळा महाविद्यालय, विद्यापीठ व शैक्षणिक संस्थामध्ये माहिती अधिकार या विषयावर आधारित पथनाट्य, प्रश्नमंजुषा, निबंधस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्रे व व्याख्यानाचे आयोजन करण्यात यावे. माहितीचा अधिकारी अधिनियम, 2005 चे कलम 4अंतर्गत प्रत्येक कार्यालयाने जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांची नावे व पदनाम दर्शविणारे फलक लावणे, 17 मुद्यांची माहिती प्रसिद्ध करणे, अर्जाचे तातडीने निपटारा करणे व शास्तीचे प्रकरणे तातडीने हाताळून अनुपालन अहवाल आयोगाकडे पाठविणे इत्यादी कामे तातडीने मार्गी लावावे. माहिती अधिकार अधिनियमांच्या तरतुदींची माहिती जास्तीत जास्त लोकांना मिळेल यादृष्टीने प्रत्येक कार्यालयाने जनजागृती करावी, असेही आवाहन राज्य माहिती आयोगाव्दारे करण्यात आले आहे.

000000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती