पंतप्रधान साधणार जिल्हा प्रशासनाशी संवाद; पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

 पंतप्रधान साधणार जिल्हा प्रशासनाशी संवाद;

पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

 

          अमरावती, दि. 28: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत शनिवार दि. 30 सप्टेंबर रोजी धारणी तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांशी दुरदृष्य प्रणालीव्दारे संवाद साधणार आहे. हा संवाद कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे.  त्याअनुषंगाने आज कार्यक्रमाची पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज आढावा बैठक  घेतली. यावेळी कार्यक्रमाची व्यवस्था सुयोग्य पार पाडण्यासाठी संबधित विभाग प्रमुखांकडे जबाबदारी सोपविण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी दिले.

            केंद्र सरकारकडून सामाजिक आणि आर्थिक मागास तालुक्यांच्या शाश्वत विकासासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणीचा त्यामध्ये समावेश करण्यात आला असून येथील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाची प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. पंतप्रधानांसोबत दुरदृष्य प्रणालीव्दारे संवाद साधणार  असल्याने इंटरनेट सेवा अखंडित सुरू ठेवण्याचे निर्देश बीएसएनएलला यावेळी देण्यात आले आहेत. पंतप्रधानांशी होणारा संवाद सुरळीत व्हावा, या दृष्टीने संबधित विभाग प्रमुखांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी धारणी येथील नागरिकांची निवड करणे, कार्यक्रमाच्या ठिकाणी येणारे अधिकारी व अन्य लोकांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था पुरविण्याचे निर्देश पोलिस यंत्रणेला देण्यात आले आहेत. याअनुषंगाने नीती आयोगाची चमू दाखल होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्या आकांक्षित तालुक्याच्या आराखडा नीती आयोगाला सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात येत असून प्रत्येक विभागाने पूर्णतयारीने उपस्थित राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिले.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती