आयकर विभागामार्फत विविध विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा

 

आयकर विभागामार्फत विविध विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा

अमरावती, दि. 15 : आयकर विभाग एक्झम्प्शन रेंज नागपूरच्या वतीने मंगळवार दि. 12 सप्टेंबर रोजी आईसीएआई भवन सातुर्णा अमरावती येथे आयकर कायद्यासंदर्भातील विविध विषयावर कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तज्ज्ञाव्दारे मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेत ‘आयकर कायद्यातील धर्मादाय संस्थांशी संबधित सुट व तरतुदी’ आणि ‘नोंदणीसाठी मूलभूत आवश्यकता आणि धर्मादाय संस्थाच्या नोंदणी प्रक्रियेतील अलीकडील बदल’ या विषयावर जनजागृती करण्यात आले. यावेळी उपआयकर आयुक्त आकाश यादव, आयकर अधिकारी संदीप गांजे, पंकज शास्त्री, आरती वकील यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थितांचे प्रश्नाचे उत्तरे देऊन त्यांचे समाधान करण्यात आले.

ही कार्यशाळा आयकर आयुक्त पुणे अभिनय कुंभार व अतिरिक्त आयुक्त नागपूरचे अमोल खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी विश्वस्त, सीए आणि आयटीपी आदिची मोठया संख्येने उपस्थित होते. तर आईसीएआईचे अध्यक्ष विष्णुकांत सोनी यांचे सहकार्य लाभले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती