खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी मोहिम

 खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध

प्रशासनामार्फत तपासणी मोहिम

          अमरावती, दि. 28 : सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, मावा, नमकीन या अन्न पदार्थांना मोठी मागणी असते. त्यामुळे या काळात भेसळ, कमी दर्जाच्या उत्पादनांची बाजारात विक्री होण्याची शक्यता लक्षण अन्न व औषध प्रशासनामार्फत खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी तपासणीची मोहिम सुरु असल्याची माहिती सह आयुक्त गणेश परळीकर यांनी दिली आहे

अमरावती शहर व जिल्ह्यातील मिठाई, खवा-मावा, खाद्यतेल, वनस्पती, घी व सणासुदीचे अन्नपदार्थ उत्पादक, रिपॅकर व घाऊक विक्रेते यांचे तपासणीची विशेष मोहिम खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी राबवली जात आहे. ग्राहकांना सुरक्षित व सकस अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी संशयित पदार्थांचे नमुने घेतले जात आहेत. ऑगस्ट 2022 पासून मोहिमे अंतर्गत अमरावती जिल्ह्यात मिठाई व नमकीनचे 5, खाद्यतेल व वनस्पतीचे 4, दुध व दुग्धजन्य पदार्थांचे 19 व आटा, रवा, बेसन, मैदा इत्यादी या अन्न पदार्थांचे 13 असे एकूण 41 नमुने विश्र्लेषणासाठी घेतले असून ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर दोषींविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल. तसेच सणासुदीच्या काळात अन्न भेसळ व कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्याविरूध्द कडक कारवाई करण्याचा इशारा सहायक आयुक्त शदर कोलते यांनी दिला आहे.

खाद्यपदार्थबाबत अशी घ्या काळजी

      ग्राहकांनी अन्नपदार्थ परवानाधारक किंवा नोंदणीधारक दुकाने, व्यापाराकडूनच खरेदी करावेत. मिळाई, दुग्धजन्य पदार्थ ताजे व आवश्यकतेनुसार खरेदी करावेत व ते त्वरीत किंवा सुचनेनुसार तासाचा आता सेवन करावते. अन्न पदार्थ साठवणुक करतांना आवश्यकतेनुसार त विशिष्ट तापमानात फ्रिज मध्ये ठेवावेत. अन्न पदार्थ खरेदी करतांना यूज बाय डेट तपासून घ्यावी. उघड्या वरील अन्नपदार्थ खरेदी करून नयेत. भेसळीबाबत खात्री आल्यास त्वरीत अन्न प्रशासनाकडे तक्रार करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती