लेट्स चेंज उपक्रमांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर्स’; विद्यार्थी, पालकांनी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन


 

           अमरावती, दि. 6 : शालेय शिक्षण विभागांतर्गत लेट्स चेंज म्हणजेच बदल घडवूया उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर्स बनविले आहे. हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी  शालेय स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रफुल्ल कचवे यांनी केले.

 

लेट्स चेंज उपक्रमांतर्गत स्वच्छता मॉनिटर्सचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. हा उपक्रम सर्व जिल्ह्यात राबविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदशनाखाली लेट्स चेंज उपक्रमाचे जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. शाळेसोबत समन्वय साधण्यासाठी शिक्षण विभाग उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी ज्योती गावंडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यातील 1 लक्ष 1 हजार 439 स्वच्छता मॉनिटर या उपक्रमामध्ये सहभागी होणार असून पालकांनेही सहभागी होवून कचरामुक्त शहर मोहिम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

             

*उपक्रमाविषयी :* या उपक्रमांतर्गत विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर्स बनणार असून स्वच्छता राखण्याबाबत नागरिकांची नकळत होणारी चूक दाखवून देणार आहेत. यावर्षी हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत असून राज्यातील सुमारे 64 हजारांहून अधिक शाळांची आणि 38 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. या अभियानात विद्यार्थ्यांकडून साफ सफाई करून घेणे अपेक्षित नाही. तर, विद्यार्थी 'स्वच्छता मॉनिटर' होण्याची जबाबदारी घेतील. कुठेही निष्काळजीपणे कचरा टाकताना किंवा थुंकताना दिसले, तिथे त्या व्यक्तीला थांबवून चूक दाखवून ती सुधारायला सांगतील. नंतर ह्या घटनेचे छोटे मजेशीर विवरण देतानाचे व्ह‍िडिओ सोशल मीडियावर शेअर करतील. ह्या अभियानात निवडलेल्या विद्यार्थ्यांना 'महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर' ओळखपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती