वरुड ग्रामीण रुग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

 



वरुड ग्रामीण रुग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

आरोग्य सेवेचे उत्कृष्ट कार्य केलेल्यांचा सत्कार

अमरावती, दि. 8 (जिमाका): जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी वरुड येथील ग्रामीण रुग्णालयाला नुकतीच भेट देऊन पाहणी केली. आरोग्य सेवेचे उत्कृष्ट कार्य केलेले डॉक्टर्स, परिचारक, परिचारिका तसेच सफाई कामगारांचा यावेळी सत्कार करुन त्यांना गौरविण्यात आले. कोविड काळामध्ये आरोग्य विभागाने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता केलेल्या रुग्ण सेवेमुळे अनेकांना जीवनदान लाभले. तसेच कोविड लसीकरणासाठीही आरोग्य विभागाने केलेल्या कार्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण शक्य झाले. यामुळे कोविडची लाट थोपवून ठेवण्यासाठी आपण यशस्वी ठरलो. यामध्ये आरोग्य विभागाचे योगदान अमुल्य आहे, असे गौरवोद्गार यावेळी श्री. कटियार यांनी काढले.

आमदार देवेंद्र भुयार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार, तहसीलदार रवींद्र चव्हाण, संतोष आष्टीकर, वरुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल देशमुख तसेच वरुड नगरपरिषद, तहसील कार्यालयाचे पदाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, जरुडचे सरपंच तसेच सदस्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी वरुड तहसील कार्यालयाच्या प्रशस्त व अद्ययावत कार्यालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी या इमारतीतील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या उपविभागीय अधिकारी मोर्शी यांच्या कॅम्प कार्यालयाचे उद्घाटन श्री. कटियार यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सर्व तालुकास्तरीय विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. तालुकास्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा करुन पुढील कामांसाठी नियोजित आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

पुसला येथे नव्याने उभारणी केलेल्या गौणखनिज संयुक्त तपासणी नाक्यास भेट देऊन तेथील तपासणीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर मौजा शहापूर येथील अभिषेक कोट फायबर्स या जीनिंग व प्रेसिंग मिलला भेट दिली. राजेश गांधी यांनी या संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. मौजा जरुड येथे मनरेगांतर्गत ग्रामपंचायत जरुडमार्फत तयार करण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटलाही श्री. कटियार यांनी भेट दिली. तसेच अटल भूजल योजनेंतर्गत झालेल्या कामांची पाहणी केली. जरुड ग्रामपंचायतीमार्फत तयार करण्यात आलेल्या आरओ एटीएम मशीनचे त्यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायतमार्फत करण्यात आलेल्या कामांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

*****

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती