Tuesday, September 5, 2023

मागासवर्गीय शासकीय वसतीगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु;20 सप्टेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

 

मागासवर्गीय शासकीय वसतीगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु;20 सप्टेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

            अमरावती, दि. 5: सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हा व तालुकास्तरावरील वसतीगृहात प्रवेशासाठी बुधवार दि. 20 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

             जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासर्वग आणि आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतीगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोई-सुविधा मोफत पुरविण्यात येतात. सन 2023-24 साठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी स्थानिक वसतिगृहामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेश अर्ज  विभागीय स्तरावरील संत गाडगेमहाराज मुलांचे शासकीय वसतिगृह निंभोरा, अमरावती येथे प्रवेश अर्ज स्विकारले जातील. तसेच मुलींच्या वसतिगृहामध्ये व्यावसायिक महाविद्यालय प्रवेशासाठी प्रवेश अर्ज विभागीय स्तरावरील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह कॅम्प रोड, अमरावती येथे स्विकाराले जातील. तर तालुका स्तरावरील मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहामध्येच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ऑफलाईन प्रवेशअर्ज स्विकारले जातील.

           संबंधित तालुका व जिल्हास्तरावरील वसतिगृहात प्रवेशाबाबत इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह विहित मुदतीत संबंधित गृहपाल/गृहप्रमुख यांचेकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000



No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...