Posts

Showing posts from March, 2018
Image
“ दिलखुलास ”   मध्ये महाऑनलाईनचे मुख्य परिचालन अधिकारी प्रसाद कोलते मुंबई ,  दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित  ‘ दिलखुलास ’  कार्यक्रमात महाऑनलाईन सेवा या वेबसाईटच्या कामकाजा विषयी महाऑनलाईनचे मुख्य परिचालन अधिकारी प्रसाद कोलते यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत सोमवार दि.2 ,  मंगळवार दि. 3 आणि बुधवार दि.4 एप्रिल रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनी वरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका पुनम चांदोरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे. महाराष्ट्र शासन आणि टाटा कन्सल्टंसी सर्विसेस यांचा संयुक्त उपक्रम असणा-या महाऑनलाईनची स्थापना , नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा , महाऑनलाईनद्वारे राबविण्यात येणारे विविध उपक्रम ,  प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीस करण्यात आलेली मदत ,  महाऑनलाईनला मिळालेले पुरस्कार आणि डिजिटल लॉकर आदी विषयाची माहिती श्री. कोलते यांनी  ‘ दिलखुलास ’  कार्यक्रमातून दिली आहे. ००००
Image
अण्णांना अपेक्षित लोकायुक्त महाराष्ट्रात लवकरच   -  मुख्यमंत्री फडणवीस                    मुख्यमंत्री यांच्या उपस्थित ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण मागे           ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अपेक्षित असलेला लोकायुक्त महाराष्ट्रात लवकरच  नियुक्त करण्यात येईल अशी ग्वाही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.          रामलिला मैदान येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज उपोषण सोडले. यावेळी श्री. हजारे यांच्या मागण्या मान्य केल्याचे निवेदन सोपविल्यानंतर मंचावर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यावेळी मंचावर उपस्थित होते.        मुख्यमंत्री म्हणाले, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या विविध मागण्या केंद्र शासनाने मान्य केल्या असून यासंदर्भातील प्रधानमंत्री कार्यालयाचे पत्र आज आम्ही सोपविले आहे. देशात भ्रष्टाचार मुक्त वातावरणासाठी केंद्र शासन श्री. हजारे यांना पूर्ण समर्थन देते. यासंदर्भात केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त नेमण
Image
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा विभागीय मेळावा कर्मचा-यांनी सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून काम करावे -            पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील अमरावती, दि. 29 : राज्य शासनाच्या विविध योजना व उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचविताना वंचितांना लाभ मिळवून देण्यासाठी कर्मचा-यांनी सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून काम केले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले.    कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित विभागीय मेळाव्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते.    जिल्हाधिकारी अभिजित बांगर, आदिवासी विकास उपायुक्त नितीन तायडे, महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, एल. जे. वानखडे, पी. बी. इंगळे आदी उपस्थित होते.    श्री. पोटे- पाटील म्हणाले की,    कर्मचा-यांनी हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव जोपासली पाहिजे. महाराष्ट्राचा प्रशासनावर होणारा खर्च हा मध्यप्रदेशच्या तुलनेत वीस टक्क्यांनी अधिक आहे. जनसामान्यांकडून मिळणा-या करातूनच प्रशासनावरचा खर्च होतो. त्यामुळे सामाजिक बांधीलकीतून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याची आपली जबाबदारी कसोशीने पाळली पाहिजे. क
Image
अर्थसंकल्पीय अधिवेशनात 20 विधेयके मंजूर शेतकऱ्यांना दिलासा देणारे महत्वपूर्ण निर्णय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 28 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भूसंपादन, हुक्काबारचे कायद्याद्वारे नियमन यासारखे 20 महत्वपूर्ण विधेयक दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करण्यात आले. अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे समाजाच्या सर्वच क्षेत्रातून स्वागत करण्यात आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोपानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, अर्थमंत्र्यांनी पुरोगामी अर्थसंकल्प मांडला. कृषी, पायाभूत सुविधा, जलसिंचन यासह विविध क्षेत्रात भरीव तरतूद करण्यात आली. त्यामुळे समाजाच्या सर्वच क्षेत्रातून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दुष्काळ, गारपीट, बोंडअळीमुळे झालेल्या नुकस
Image
महाराष्ट्र राज्य माहिती आयुक्तांची‍ नेमणूक करणार - मुख्यमंत्री         मुंबई ,  दि. 28 : महाराष्ट्र राज्य माहिती आयुक्त हे पद रिक्त असून या पदावर येत्या चार आठवड्यात नेमणूक करण्यात येईल ,  असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.             सदस्य संजय दत्त यांनी उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्यावर ते बोलत होते.
Image
सोमवारी मंत्रालयात ऑनलाईन लोकशाही दिन मुंबई ,  दि. 28 :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार ,  2 एप्रिल ,  2018 रोजी सकाळी 11 वाजता ,  मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री समिती कक्ष येथे ऑनलाईन लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. मंत्रालय लोकशाही दिनी ज्या अर्जदारांनी अर्जाच्या विहित प्रपत्राच्या नमुन्यानुसार अर्जाची आगाऊ प्रत व त्यासह आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडल्या असतील आणि ज्यांना अर्ज स्वीकृतीबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत कळविण्यात आले आहे ,  अशा मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील अर्जदारांना लोकशाही दिनी मुख्यमंत्री यांच्यासमक्ष निवेदन करण्याकरिता मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यातील संबंधित अर्जदारांनी त्यांची तक्रार मुख्यमंत्री यांच्याकडे मांडण्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात दिनांक 2 एप्रिल ,  2018 रोजी सकाळी 10.30 वाजता प्रत्यक्ष उपस्थित रहावे. ज्या तक्रारदारांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत आणि ज्या अर्जदारांना दूरध्वनीद्वारे दूरचित्रवाणी परिषदेकरिता उप
Image
राज्यात गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट कायदा ,  सुव्यवस्थेची परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात - मुख्यमंत्री मुंबई ,  दि. 27: गृह विभागाने हाती घेतलेल्या व्यापक उपाय योजनांमुळे राज्यात बहुतांश प्रकारच्या गुन्ह्यात घट झाली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यस्था संपूर्ण नियंत्रणात आहे. राज्यातील सर्वच समाज घटकाला सुरक्षितता वाटेल यासाठी शासनाकडून पोलीस दलाचे आधुनिकीकरण तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अद्ययावतीकरण करण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील ,  याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान सभेत दिली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मांडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवरील 293 च्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील ,  सदस्य सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण ,  अजित पवार ,  जयंत पाटील ,  अनिल गोटे ,  जितेंद्र आव्हाड ,  सुनील प्रभू ,  ॲड आशिष शेलार ,  शशिकांत शेलार ,  सुरेश गोरे ,  भारत भालके ,  शरद सोनवणे ,  श्रीमती यशोमती ठाकूर आदींनी या चर्चेत भाग घेतला होता. यावरील चर्चेला मुख्यमंत्री उ