Monday, March 26, 2018

'हॉर्न नको' आणि 'रस्ते सुरक्षे'चा संदेश देत 'वानखेडे'वर रंगला 20 - 20 क्रिकेट सामना*
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला सामन्याचा शुभारंभ

            मुंबई, दि. 24 :ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी वाहन चालविताना हॉर्न वाजवू नकातसेच रस्ता सुरक्षेचा संदेश देण्यासाठी मुंबईत आज भारतीय क्रिकेट संघातील खेळाडुंचा विशेष 20 -20 सामना खेळण्यात आला. 
            वानखेडे स्टेडियम येथे आयोजित या मॅचचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. परिवहन मंत्री दिवाकर रावते, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कप्तान नरी कॉन्ट्रॅक्टर यावेळी उपस्थित होते. 
            यावेळी माजी कप्तान सुनिल गावसकर, अजित वाडेकर यांना शाल आणि ट्रॉफी देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
हॉर्न नॉट ओके प्लिजअभियान
            वातावरणातील बहुतांश ध्वनी प्रदुषण हे वाहनांच्या ध्वनीमुळे होते आणि त्यातील साधारण 70 टक्के ध्वनी प्रदूषण हे वाहनचालकांनी विनाकारण हॉर्न वाजविल्यामुळे होते, असे विविध अभ्यासातून पुढे आले आहे. या ध्वनी प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. हे रोखण्यासाठी परिवहन विभागामार्फत मागील काही महिन्यांपासून हॉर्न नॉट ओके प्लिजअभियान राबविले जात आहे. तसेच रस्ते अपघात रोखण्यासाठी रस्ते सुरक्षा जनजागृती अभियान राबविले जात आहे. या दोन्ही मोहीमांविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या उद्देशाने या विशेष 2020 क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्य शासनाचा परिवहन विभाग, मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि टाटा ग्रुप यांच्यामार्फत हा सामना आयोजित करण्यात आला होता. नो हाँकींग 11विरुद्ध रोड सेफ्टी 11या दोन क्रिकेट संघांमध्ये हा सामना झाला.
       नो हाँकींग 11संघात के. एल. राहूल, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, युवराज सिंह, दिनेश कार्तिक, आर्यमन विक्रम बिर्ला, कृणाल पंड्या, हरभजन सिंग, जसप्रित बुमराह, शिवम मावी, शार्दुल ठाकूर या खेळाडूंचा समावेश होता. रोड सेफ्टी 11संघात इशन किशन, शिखर धवन, सुरेश रैना, मनोज तिवारी, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, अभिशेक नायर, युजवेंद्र चहल, कमलेश नागरकोटी, विनय कुमार, प्रविण तांबे या खेळाडुंचा समावेश होता.
            रोड सेफ्टी 11 संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत प्रेक्षकांच्या उत्साहपूर्ण प्रतिसादात हा सामना सुरु होता. 
            वाहन चालविताना विनाकारण हॉर्न वाजवू नका, वाहतुकीचे नियम पाळा, रस्त्यावर सुरक्षीत वाहतूक करा असा संदेश यावेळी उपस्थित खेळाडू आणि मान्यवरांनी दिला.
00000





No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...