महाराष्ट्राला आजपर्यंत ७७४ पद्म पुरस्कार

नवी दिल्ली दि. १७: देशात आजपर्यंत ४५०१ व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेयामध्ये ४५ भारतरत्न३०३ पद्मविभूषण१२४१ पद्मभूषण आणि २९१२ पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. या पद्म पुरस्कारात महाराष्ट्रातील ७७४ मान्यवरांचा समावेश आहे.
देशात १९५४ सालापासून पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येतात. कलाविज्ञान व तंत्रज्ञानक्रीडाव्यापार व उद्योगसामाजिक कार्यवैद्यकशास्त्रसाहित्य व शिक्षणनागरी सेवा आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
४५ मान्यवरांना भारतरत्न प्रदान
आजपर्यंत ४५ मान्यवर व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला व खान अब्दुल गफार खान हे अभारतीय व्यक्ती आहेतज्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. १९९० साली भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर ( मरणोत्तर ) व नेल्सन मंडेला यांना भारतरत्न जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातील ८ मान्यवर व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे,यामध्ये महाराष्ट्रातून स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर या एकमेव महिला आहेत तर देशातून ५ महिलांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पद्मविभूषण पुरस्काराने ३०३ मान्यवर सन्मानित
देशात आजपर्यंत ३०३ व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पद्मभूषण पुरस्काराने १२४१ तर पद्मश्री पुरस्काराने २९१२ मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे. या पद्म पुरस्कारात देशातील ५५० महिलांचा समावेश आहेयामध्ये महाराष्ट्रातील १३२ महिलांचा समावेश आहे.
देशातील ३९८ महिलांना पद्मश्री पुरस्कार
देशात आजपर्यंत प्रदान करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये ३९८ महिलांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ९६ महिलांचा समावेश आहे. पद्मभूषण पुरस्कार आजपर्यंत ११३ महिलांना प्रदान करण्यात आला आहे,यामध्ये महाराष्ट्रातील २८ महिलांचा समावेश आहे तर ३४ महिलांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आला,यामध्ये महाराष्ट्रातील ७ महिलांचा समावेश आहे.
महाराष्ट्राला ४६५ पद्मश्री पुरस्कार
महाराष्ट्राला आजपर्यंत ४६५ पद्मश्री२४२ पद्मभूषण५९ पद्मविभूषण व ८ भारतरत्नअसे एकूण ७७४ पद्म पुरस्कार मिळाले आहेत.
0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती