Wednesday, March 28, 2018

सोमवारी मंत्रालयात ऑनलाईन लोकशाही दिन

मुंबईदि. 28 :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार2 एप्रिल2018 रोजी सकाळी 11 वाजतामंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री समिती कक्ष येथे ऑनलाईन लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.
मंत्रालय लोकशाही दिनी ज्या अर्जदारांनी अर्जाच्या विहित प्रपत्राच्या नमुन्यानुसार अर्जाची आगाऊ प्रत व त्यासह आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडल्या असतील आणि ज्यांना अर्ज स्वीकृतीबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत कळविण्यात आले आहेअशा मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील अर्जदारांना लोकशाही दिनी मुख्यमंत्री यांच्यासमक्ष निवेदन करण्याकरिता मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार आहे.
मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यातील संबंधित अर्जदारांनी त्यांची तक्रार मुख्यमंत्री यांच्याकडे मांडण्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात दिनांक 2 एप्रिल2018 रोजी सकाळी 10.30 वाजता प्रत्यक्ष उपस्थित रहावे. ज्या तक्रारदारांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत आणि ज्या अर्जदारांना दूरध्वनीद्वारे दूरचित्रवाणी परिषदेकरिता उपस्थित राहण्याबाबत सूचना दिल्या आहेतअशा अर्जदारांना जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरचित्रवाणी परिषद दालनात प्रवेश देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.
००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...