Tuesday, March 27, 2018

आंबेडकरी चळवळीचा ज्येष्ठ
मार्गदर्शक हरपला : मुख्यमंत्री

मुंबईदि. २७ :  प्रसिद्ध विचारवंत  प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ आणि साहित्याला वैचारिकतेचे अधिष्ठान देणारा एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहेअशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतातव्यासंगी प्राध्यापककृतीशील विचारवंत आणि परखड समीक्षक म्हणून एक स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या डॉ. पानतावणे यांनी वंचित-उपेक्षितांच्या प्रबोधनासह सक्षमीकरणासाठी  दिलेले योगदान 'अस्मितादर्श  म्हणून  समाजाला सतत मार्गदर्शन करीत राहील. विशेषतः साहित्यिकांच्या नव्या पिढीला अभिव्यक्तीसाठी माध्यम उपलब्ध करुन देण्यासह तिच्या वैचारिक जडणघडणीतही त्यांचे मोलाचे योगदान होते.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...