महाराष्ट्राची पैठणी’ आजिविका मेळयात आकर्षणाचे केंद्र
राज्यातील 14 बचत गटांचा समावेश
नवी दिल्लीदि. 27 :  महाराष्ट्राची पैठणी’ सरस आजिविका मेळयात आकर्षणाचे केंद्र ठरत असून राज्यातील अन्य दालनालाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील एकूण 14 महिला बचत गटांचा समावेश या मेळयात आहे.
केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या पुढाकाराने येथील प्रगती मैदानात सरस आजिविका-2018 मेळयाचे आयोजन करण्यात आलेले आहे. विविध राज्यातील हस्तकलालघुउद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध दालने याठिकाणी मांडली आहेत. राज्यातील ग्रामविकास मंत्रालयाअंतर्गत येणा-या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने येथे 14 दालने उभारण्यात आलेले आहेत.
महाराष्ट्राचे पैठणीकोल्हापूरी चप्पलरत्नागिरीचा काजुनासिकचे मनुकेभटकी चित्रकलायवतमाळचे सुखे मशरूमबांबुचे वस्तुलाकडी सजावटीच्या वस्तुकलात्मक रांगोळीरत्न जडीत आभुषणे अशी वैविध्यपुर्ण चांदा ते बांदापर्यंतचे  14  बचत गटांचा समावेश याठिकाणी आहे.
आजिविका मेळयात गोंदिया जिल्ह्यातील तालुका सालेकसातील आरजू बचतगटातर्फे लाकडी साजवटीच्या वस्तु ग्राहकांचे लक्ष वेधुन घेत आहे. या लाकडी वस्तु सागवनापासून बनलेल्या आहेत. याशिवाय या वस्तुंचे वेगवेगळया सुटये तुकडे करून त्या वस्तु लगेचच जोडताही येते या सजावटींच्या वस्तुंची किंमतही माफक असल्याचे बचत गटाच्या रेखा भगत यांनी माहिती दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अमृता कदम यांच्या उद्योगिनी बचत गटातर्फे पारंपारिक दाग-दागिण्यांना न्यु लुक’ देऊन देण्याचा प्रयत्न श्रीमती कदम करीत आहेत. त्यांच्या या अलकांराना खूप मागणी आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुकाच्या इंदिरा कांबळे यांचा दालनामध्ये सुखे मशरूममशरूमचे पावडर ठेवलेले आहेत. मशरूमामुळे शरीराला होणारे फायदयांचा फलकही त्यांनी लावलेला आहे. सुख्या मशरूमांची मागणी मोठया प्रमाणात असल्याचे ते सांगतात. त्यांच्या बचत गटात मशरूमवर प्रक्रियाकरून त्याला वाळविले तसेच त्याचे पावडर तयार केले जाते. हे वाळविलेले मशरूम किमान 8 ते 10 महिने टिकते. दिल्लीत प्रथम: संधी मिळाल्याचा त्यांना आनंद आहे. दिल्लीकरांचा प्रतिसाद थोडा अधिक वाढावा अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
आधी बांबुने फक्त टोपलीपरडीसुप बनविणा-या गोंदिया जिल्ह्यातील सुमित बचत गटांच्या कलाबाई कुंमरे आता बांबुपासून विविध सजावटीच्या तसेच गृहउपयोगी वस्तु बनवितात. यामध्ये टेबल दिवेपेन-पेन्सिल बॉक्सअशा वस्तुंचा समावेश त्यांच्या दालनामध्ये दिसतो. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत त्यांना मिळालेले प्रशिक्षणामुळे त्यांना ही नवीन कला अवगत झाली असल्याचे ते सांगतात. हाताला नवीन रोजगार आणि संधी मिळाल्याचे त्यांनी व्यक्त केले.
भटक्या जमातीतुन मोडणा-या गोंदिया जिल्ह्यातील तालुका गोरेगाँवच्या योगिता मौजे यांचे भटक्या चित्रकलेचे दालन सर्वांचे लक्ष वेधुन घेते. आदिवासी चित्रकला वारली’ च्या धर्तीवर भटक्या समाजातील जीवनपद्धती त्यांच्या चित्रकलेतुन दिसते.
याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यातील गौतमी बचत गटाचे रंगोळी चे दालनही मेळयामध्ये आकर्षण ठरत आहे. त्यांच्या जवळ रांगोळीचे विविध छापेपेनसाहित्य आहेत. नाशिकतील अपेक्षापुर्ती बचत गटातर्फे मनुकेगडचिरोली जिल्ह्यातीली चामोर्शीमधील दुर्गा बचत गटातर्फे अगरबत्तीचंडिका बचत गटातर्फे काजूवर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामधील पशु उन्नती संसाधन केंद्रातर्फे साबननिम तेलऔरंगाबाद जिल्ह्यातील रोहिदास बचत गटातर्फे नक्षीकाम केलेली कुर्ती आ तर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यामधीले वैष्णवी बचत गटातर्फे  सेंद्रिय तांदुळहळद,डाळी यांचे दालनालाही प्रतिसाद आहे. हा मेळा 1 एप्रिलपर्यंत सकाळी 10 ते सांयकाळी 8 पर्यंत असणार आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती