नेहरू युवा केंद्राच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा
विधायक कार्यात युवकांचा सहभाग वाढवावा
-             अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

अमरावती दि. 23: लोककल्याणासाठी राबविण्यात येणा-या विविध शासकीय योजना व उपक्रमांमध्ये युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आज येथे दिले.
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयांतर्गत स्थापित जिल्हा नेहरु युवा केंद्राच्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेण्यात आला. श्री. परदेशी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
 प्रारंभी केंद्राच्या समन्वयक ज्योती मोहिते यांनी केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.   जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील स्थानिक युवक, तसेच महिलांना प्रशिक्षणातून रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न व्हावेत, असे श्री. परदेशी यांनी सांगितले.
समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप काळे, राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगे बाबा विद्यापीठाचे संचालक डॉ. राजेश मिरगे, खादी ग्रामोद्योगचे आर. एल. तायडे, क्रीडा अधिकारी बी. के. घटाळे, डीएमएचपीच्या प्रोगाम ऑफिसर डॉ. स्वाती सोनोने, शासकीय रुग्णालयाचे जिल्हा सल्लागार डॉ. मंगेश गुजर, जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग निरीक्षक वंदना भगत, एन.सी.सी.पी चे प्रकल्प संचालक प्रवीण येवतीकर, अशासकीय सदस्य जयंत डेहणकर, कौशल्य विकासचे निशिकांत पोफळी, सदस्य नेहरु युवा केंद्र समितीचे सदस्य दिनेश गाडगे, शरद वसंतराव गढीकर आदी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती