Tuesday, March 20, 2018

आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते आपलं मंत्रालय - मार्च २०१८ चे प्रकाशन

मुंबईदि. १९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी  यांच्यासाठी असलेल्या आपलं मंत्रालय - एक सुसंवाद या मासिकाच्या मार्च महिन्याच्या अंकाचे प्रकाशन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संपादक सुरेश वंदिलेविभागीय संपर्क अधिकारी अजय जाधव आदी उपस्थित होते.
२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन व 8 मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जातो. त्या निमित्ताने या विशेषांकात विधिमंडळ व  मंत्रालय परिसर तसेच अन्य शासकीय कार्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाचे सचित्र वृत्तांतराज्यपालांचा साहित्यिकांशी सुसंवादराज्य शासनाचा वाड्मयीन पुरस्कराचा वितरण कार्यक्रमआम्ही गायले मराठी गीत,  शब्दकोष ॲप व  8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त चर्चा सत्रअस्मिता योजनामासिक पाळीचे ते दिवसही पवित्र असतातस्वातंत्र्य आणि अस्मिता आदी लेख तसेच कविता,खुशखुशीत व्यंगचित्रे आदींचा  समावेश आपलं मंत्रालय मासिकात करण्यात आला आहे. हे मासिक त्रिमूर्ती प्रागंणातील लोकराज्य स्टॉलवर तसेच मंत्रालयातील सर्व उपहारगृहांत विनामूल्य उपलब्ध आहे

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...