साखर कारखानदारांच्या समस्यासंदर्भात
उपाय सुचविण्यासाठी विशेष समितीची स्थापना करावी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईदि. 21 : राज्यातील साखर उद्योगांच्या समस्यासंदर्भात उपाय योजण्यासाठी सहकार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विशेष शक्तीप्रदत्त समितीची स्थापना करण्याचे तसेच केंद्राकडे असलेल्या विविध विषयांवर पाठपुरावा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
            साखर कारखानदारांच्या समस्यासंदर्भात तसेच बंद पडलेल्या साखर कारखान्यांसंदर्भात आज विधानमंडळात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. साखरेचे दरअतिरिक्त उत्पादनामुळे होणारी अडचणएफआरपीचा दरऊस क्षेत्रात झालेली वाढ आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेसाखर कारखानदारांच्या व उद्योगांच्या समस्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून या संदर्भात उपाय सुचविण्यासाठी सहकार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारअन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापटग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सहकारी साखर संघखासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधींसह विविध विभागाचे सचिव यांचा समावेश आहे. ही समिती तातडीने कारखानदारांच्या समस्यासंदर्भात उपाय सुचविणार आहे.
राज्यात अतिरिक्त साखर उत्पादन होण्याची शक्यता लक्षात घेऊन साखर निर्यात करण्याची परवानगी द्यावी व त्यासंदर्भात प्रत्येक कारखान्याला निर्यातीचा कोटा ठरवून देण्यासंदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाशी निगडीत विषयासंदर्भात प्रधानमंत्री यांची भेट घेण्यासाठी सर्व पक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. वळसे पाटील यांनी साखर कारखानदारांच्या समस्यासंदर्भात माहिती दिली. सहकार मंत्री सुभाष देशमुखग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेविधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलमाजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटीलमधुकरराव चव्हाणमाजी उपमुख्यमंत्री अजित पवारमाजी मंत्री सर्वश्री राजेश टोपेहसन मुश्रीफआमदार चंद्रदीप नरकेअमल महाडिक,राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदार महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरेराज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळसहकार विभागाचे प्रधान सचिव एस.एस. संधूसाखर आयुक्त संभाजी कडू पाटील आदी उपस्थित होते.
००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती