‘वेकोलि’ आणि ‘महानिर्मिती’चा सामंजस्य करार
 भानेगाव येथील कोळसा खाणीतील पाणी उचलून खापरखेडा विद्युत केंद्रात
वापरणेबाबत वेस्टर्न कोल फिल्ड लि. व महानिर्मिती कंपनी यांच्यात आज एक सामंजस्य करार करण्यात
आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
वेकोलिचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा व महानिर्मितीचे संचालक (प्रकल्प)
विकास जयदेव यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने
वेकोलि व महानिर्मितीने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व लक्षात घेता या महत्वाकांक्षी योजनेला आकार दिला
आहे. यावेळी वेकोलिचे संचालक डॉ. संजयकुमार, कार्यकारी संचालक प्रदीप शिंगाडे, मुख्य अभियंता अनंत
देवतारे, मुख्य अभियंता राजकुमार तासकर तसेच सी.एम.डी वेस्टर्न कोलचे संचालक (वित्त) एस. एम.चौधरी ,
टी.एन.झा, महाप्रबंधक डी.एम. गोखले, अनुराग अरोरा उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती