व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन मिशनसाठी ‘सिद्धिविनायक’कडून 10 कोटी
मुंबईदि. 27 : राज्यातील खेड्यांच्या परिवर्तनासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन मिशन)साठी श्री सिद्धीविनायक गणपती न्यासाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दहा कोटी रुपयांचा धनादेश दिला. श्री सिद्धीविनायक न्यासाच्या वतीने मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी हा धनादेश आज विधानभवनातील कार्यक्रमात दिला.
राज्यातील 1000 खेड्यांचे रूपांतर आदर्श खेड्यामधे करुन  त्यामध्ये शाश्वत विकासासह ती सर्वांगीणदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी राज्य शासनाकडून ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या सहाय्यासाठी सिद्धीविनायक न्यासाकडून 10 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. या अर्थसहाय्याचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणालेग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी स्थापन करण्यात आलेले ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान फाऊंडेशन हे सरकारी व सार्वजनिक भागिदारीतून साकारणारे आगळेवेगळे मंच आहे. या अभियानात सहभागी होणारे सिद्धीविनायक न्यास ही पहिलीच सामाजिक धर्मादाय संस्था आहे. ग्रामीण भागाच्या परिवर्तनासाठी सहभागी झाल्याबद्दल सिद्धीविनायक न्यासचे मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो.
राज्यातील खेड्यांच्या विकासासाठी आगळा वेगळा उपक्रम राबविल्याबद्दल श्री. बांदेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.
या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदेआमदार सुनील प्रभूमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशीश्री सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष सुमंत घैसासविश्वस्त भरत पारिखआनंद रावसंजय सावंतमहेश मुदलियारगोपाळ दळवीसुबोध आचार्यविशाखा राऊतपंकज गोरेकार्यकारी अधिकारी संजीव पाटीलउप कार्यकारी अधिकारी रवी जाधव आदी उपस्थित होते.
००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती